आदर्श मुले घडविणाऱ्या महापालिका कर्मचारी, अधिकाऱ्यांचा सन्मान
सर्वंट सोशल फाउंडेशनचा उपक्रम
सोलापूर : विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणारी मुले घडविणाऱ्या महापालिकेतील आदर्श कर्मचारी – अधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा सोलापूर महानगरपालिका सर्व कर्मचारी संघटना संचलित सर्वंट सोशल फाउंडेशनच्या वतीने महापालिकेत रविवारी पार पडला.
विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त अशा आदर्श मुले घडविणाऱ्या महापालिकेतील कर्मचारी/ अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, उपायुक्त आशिष लोकरे, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले, सहाय्यक आयुक्त ज्योती भगत यांच्या हस्ते हा सन्मान करण्यात आला. यावेळी मुख्य सफाई अधीक्षक एन. सी. बिराजदार , कामगार नेते अशोक जानराव, गवसू तांत्रिक अधिकारी अविनाश वाघमारे , मुख्य आरोग्य निरीक्षक सुधाकर नागटिळक,
संस्थापक शेषराव शिरसट आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.
प्रारंभी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीस अभिवादन करण्यात आले. समता सैनिक दल , शाक्य दल, महार रेजिमेंट यांच्या वतीने मानवंदना देण्यात आली. यावेळी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शेषराव शिरसट, उत्सव अध्यक्ष पद्मावती इंगळे , शुभम रणखांबे , सतीश नागटिळक , अमोल सावंत, जयकुमार कांबळे, वंदना कांबळे, विठोबा शिंदीबंदे , पांढरे, सुनील राठोड, अतुल मस्के, परवेज शेख, विकी पात्रे, संघा आहेरकर, सुधाकर कांबळे, सुजित काळे, राहुल बाबरे, चंद्रकांत ओव्हाळ , पप्पु सातपुते, राहुल बनसोडे, रवी अडाकुल भारत क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यांचा झाला यथोचित सन्मान
याप्रसंगी जनसंपर्क अधिकारी गणेश बिराजदार, सुभाष टाकळीकर , अश्विनी अभंगराव , ज्ञानेश्वर कस्तुरे, सुवर्णा सगरी, गायत्री मेंनशे, अनिल केदारी , जगझाप, श्रीनिवास रामगल, बाळासाहेब गोतसुर्वे , पंडित वडतीले , भीमाशंकर शिवशरण , पथ संस्थेचे चेअरमन दिलीप देशमुख , नागनाथ बिराजदार , भीम सीताफळे, बसवराज जाधव, महादेव नागशेट्टी, शोभा कापुरे , गणेश डेंगळे यांचा सन्मान सत्कार करण्यात आला