आयसीआयसीआय प्रुडेन्शियल लाइफ इन्शुरन्सने
तिसऱ्या तिमाहीसाठी सेटलमेंट प्रमाण योग्य राखले
सोलापूर (प्रतिनिधी) जीवन विमा हा आर्थिक नियोजनाचा एक आवश्यक घटक आहे,जो कुटुंबाला तसेच कर्त्या व्यक्तीवर अवलंबून असणाऱ्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करतो. पॉलिसीधारकाचे अकाली निधन झाल्यास कुटुंबाची आर्थिक सुरक्षा अबाधित राखण्यासाठी कंपनीने दिलेले हे वचन आहे.
एखाद्या प्रिय व्यक्तीच्या जाण्यामुळे होणार आर्थिक त्रास दूर करण्यासाठी हे एक साधन आहे.विम्याचा दावा करणे, ही व्यवसायासाठी महत्त्वाची घटना असते. त्यामुळे विश्वास असलेल्या ब्रँडकडूनच पॉलिसी खरेदी केली पाहिजे.
क्लेम सेटलमेंट रेशो आणि क्लेम सेटल करण्यासाठी लागणारा सरासरी वेळ याबाबत विचार करणे, हे ग्राहक-अनुकूल जीवन विमा कंपनीचे चांगले निदर्शक असते. क्लेम सेटल होण्यासाठी लागणारा टर्नअराउंड वेळ देखील महत्त्वाचा असतो, कारण लाभार्थ्यांना हक्काची रक्कम लवकर प्राप्त होणे गरजेचे असते.अर्थात, या सगळ्याची जबाबदारी पूर्णपणे विमा कंपनीवर नाही.
तर विमा काढतानाच सर्व माहिती खरी सांगणे, ही ग्राहकांची देखील जबाबदारी आहे.
यामुळे नामनिर्देशित व्यक्तींना लवकर आणि कोणत्याही त्रासाशिवाय क्लेम मिळतो.नियमांद्वारे, जीवन विमा कंपन्या त्यांचा क्लेम सेटलमेंट रेशो दर तिमाहीला घोषित करतात. याचे कारण, कोणत्याही नकोसा प्रसंग घडलाच तर कर्त्या व्यक्तीवर अवलंबून असलेल्यांचे आर्थिक भविष्य सुरक्षित आहे, याची खात्री करण्यासाठी सर्व व्यक्ती जीवन विमा खरेदी करतात.