एनटीपीसीच्या दोन्ही युनिट्सकडून 7 हजार दशलक्ष युनिटस पेक्षा जास्त सर्वाधिक वीज निर्मिती

उलट सोलापूरचे तापमान 2 अंशसेल्सिअसने कमी झाले !

एनटीपीसीच्या दोन्ही युनिट्सकडून  7 हजार दशलक्ष युनिटस पेक्षा जास्त सर्वाधिक वीज निर्मिती

मुख्य महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय यांची माहिती

सोलापूर : एनटीपीसी हे भारतातील सर्वात मोठी एकात्मिक ऊर्जा आहे. एनटीपीसी सोलापूर नेहेमीच पर्यावरण रक्षणाचा पुरस्कार केला आहे. पर्यावरण रक्षण आणि राखेच्या वापरासाठी अत्यंत जबाबदारीने काम केले जात आहे असे सांगतानाच सोलापूर सुपर थर्मल पॉवर स्टेशन च्या दोन्ही युनिट्सने यशस्वीरित्या वीज निर्मिती केली आहे. या आर्थिक वर्षात 7 हजार दशलक्ष युनिटस पेक्षा जास्त सर्वाधिक वीज निर्मिती केली आहे, अशी माहिती सोलापूर एनटीपीसी सोलापूरचे मुख्य महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय यांनी पत्रकार परिषदेत दिली.

      एनटीपीसी सोलापूर जिल्ह्यातील फताटेवाडी आणि आहेरवाडी या गावांमध्ये वसलेले आहे. पर्यावरणास अनुकूल संतुलन सुनिश्चित करून दि. 25 सप्टेंबर 2017 पासून हा प्रकल्प सुरू करण्यात आला. 2 × 660 एम (1320 एम डब्ल्यू) हे एनटीपीसी च्या सर्वात आधुनिक स्टेशनपैकी एक आहे. भारतातील सात राज्यांच्या वीज गरजा भागवणाऱ्या अर्ध शुष्क सोलापूर क्षेत्रासाठी वरदान आहे. सोलापूर थर्मल पॉवर स्टेशनची महाराष्ट्र, मध्य प्रदेश , छत्तीसगड, गोवा, उत्तर प्रदेश , दमण आणि दिव , वूटी आणि दादरा, नगर हवेली ही लाभार्थी राज्य आहेत.

        एनटीपीसी सोलापूरने सुरक्षेला प्रथम प्राधान्य दिले आहे. आयएसओ 45001: 2018 प्रमाणित स्टेशन आहे. एनओएसए च्या सदस्यांच्या टीम द्वारे बेसलाईन असेसमेंट केले गेले आहे आणि एनओएस ए स्टार ऑडिट एप्रिल 2022 मध्ये केले आहे. सुरक्षा संस्कृती आत्मसात करण्यासाठी एनटीपीसी सोलापूरने कर्मचारी आणि कामगारांमध्ये सुरक्षित पद्धती शिक्षित करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. एनओएसए प्रमाणन ऑडिटमध्ये चार प्लॅटिनम स्टार मिळवणारा एनटीपीसी सोलापूर हा पहिला प्रकल्प आहे.

      एनटीपीसी सोलापूरने पर्यावरण संरक्षण आणि राखेच्या वापरासाठी अत्यंत जबाबदारीने काम करत आहे. जास्तीत जास्त झाडे लावून प्रकल्प परिसर आणि हिरवागार आणि स्वच्छ करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. एफ वाय 2024 मध्ये स्टेशन ने आतापर्यंत सर्वाधिक राख वापर केला आहे.

    पर्यावरण राखण्यासाठी एफजीडी शोषक आणि चिमणी काम पूर्ण होण्याच्या प्रगट टप्प्यात आहे. 31 मे 2023 रोजी एफजीडी युनिट दोनचे हॉट गॅस इन साध्य केल्यानंतर एफ जी डी युनिट वन हॉट गॅस इन 14 मार्च 2024 रोजी सुरू झाले. जीवाषमाच्या उत्सर्जनातून सल्फर संयुगे काढून टाकण्याची ही प्रक्रिया पॉवर टेशन जे शोषक जोडण्या द्वारे केले जाते. फ्ल्यू गॅस मधून 97 टक्के पर्यंत सल्फर डाय ऑक्साईड काढून टाकू शकतात. यामुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते,असे

मुख्य महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय यांनी सांगितले. 

      दरम्यान, या प्रकल्पासाठी या वर्षात 1100 रेक कोळसापुरवठा झाला आहे. साधारणता सध्या पाच लाख टन कोळसा उपलब्ध आहे. त्यामुळे कोळशाबाबत कोणतीही काळजी करण्याचे कारण नसल्याचेही यावेळी त्यांनी सांगितले.

        त्याचबरोबर एनटीपीसी सोलापूरच्या वतीने जवळपासच्या फताटेवाडी, होटगी स्टेशन, आहेरवाडी, तिल्हेहाळ या चार गावांमध्ये विविध प्रकारच्या इमारती बांधणे, कम्युनिटी सेंटर बांधणे, ओव्हर हेड पाण्याच्या टाक्या, रस्ते , शौचालय, सोलर हायमास्ट, बस निवारे, पिण्याच्या पाण्याच्या पाईपलाईन, शाळा, पोलीस स्टेशन साठी कंपाउंड आदी कामे करण्यात आली आहेत. एनटीपीसी सोलापूर मे समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी शिक्षण आरोग्य रोजगाराभिमुख प्रशिक्षण महिला सक्षमीकरण पायाभूत सुविधांचा विकास आणि शिष्यवृत्ती प्रदान केली आहे, असे मुख्य महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय यांनी सांगितले.

    या पत्रकार परिषदेस महा व्यवस्थापक बिपुलकुमार मुखोपाध्याय, महाव्यवस्थापक प्रोजेक्ट व्ही एस एन मूर्ती, महा व्यवस्थापक ऑपरेशन परिमलकुमार मिश्रा, एचओ एचआर मनोरंजन सारंगी तसेच विभाग प्रमुख व अधिकारी उपस्थित होते.

  उलट दोन अंश सेल्सिअसने

 तापमान कमी झाले

एनटीपीसी प्रकल्प सुरू झाल्यापासून सर्व परिसरामध्ये उद्दिष्ट ठेवून नियोजनपूर्वक वृक्षारोपण करण्यात आले सुमारे पाच लाख वृक्षरोपण करण्यात येणार आहे त्यापैकी साडेतीन लाख झाडे लावण्यात आली आहेत पर्यावरण रक्षणाला मोठ्या प्रमाणात प्राधान्य दिले जाते. एक थेंबही लिक्विड बाहेर सोडले जात नाही. पर्यावरणाची हानी होईल असे कोणतेही पदार्थ या प्रकल्पातून बाहेर सोडले जात नाहीत. एनटीपीसी प्रकल्पामुळे येथील तापमान वाढले नाही तर दोन टक्के दोन अंश सेल्सिअसने तापमान कमी झाले आहे. येणाऱ्या तीन वर्षात आणखी तीन अंश सेल्सिअस  तापमान कमी होईल असा दावा मुख्य महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय यांनी केला.

दुहेरी जलवाहिनीसाठीचा उर्वरित 35 कोटीचा 

निधी महापालिकेला एप्रिलमध्ये देणार 

उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी योजनेसाठी सोलापूर महापालिकेला 250 कोटी रुपये एनटीपीसी प्रकल्पाकडून देण्यात येणार होते मात्र एका बैठकीत विविध चार गावातील पाणी योजनेसाठीचा लागणारा निधी वजा करून महापालिकेला एकूण 240 कोटी रुपये द्यायचे होते. त्यापैकी 205 कोटी रुपये महापालिकेला देण्यात आले आहेत. उर्वरित 35 कोटी रुपये निधी येत्या एप्रिल महिन्यातील पहिल्या आठवड्यात अदा करण्यात येणार असल्याचे मुख्य महाप्रबंधक तपनकुमार बंदोपाध्याय यांनी स्पष्ट केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *