कामगार सेनेच्या वतीने आत्मशांती पाणपोई उद्घाटन

  

               महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, वाढता उन्हाळा लक्षात घेऊन कामगार सेना कार्यालय, पद्मशाली चौक येथे नागरिक बंधू भगिनींना, कामगारांना, विद्यार्थ्यांना, मुला मुलींसाठी, आत्मशांती पाणपोईचे उद्घाटन पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार यांच्या हस्ते व महाराष्ट्र कामगार सेनेचे प्रदेश अध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या अध्यक्षतेखाली युवती सेनेच्या शहर संघटिका रेखा आडकी, कामगार सेनेचे सहसेक्रेटरी विठ्ठल कुऱ्हाडकर, पत्रकार अक्षय बबलादी, यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. या आत्मशांती पाणपोई मुळे मोठ्या प्रमाणात बंधू भगिनींची तहान भागवण्याची सोय झाली आहे. सदर पाणपोई उद्घाटन प्रसंगी वरील मान्यवरांसह निर्मला अरकाल, ज्योती गोरंनदेवाले, कृतिका वल्लमदेशी, श्रीनिवास बोगा, नागमणी भंडारी, स्वाती शिंदे रमेश चिलबेरी, गुरुनाथ कोळी, पप्पू शेख, यांच्यासह बंधू भगिनी उपस्थित होते.

            महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने, आत्मशांती पाणपोई उद्घाटन प्रसंगी यशवंत पवार विष्णू कारमपुरी (महाराज), रेखा आडकी, अक्षय बबलादी, यांच्यासह बंधू-भगिनी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *