
उत्साह पूर्ण वातावरणात रंगला दांडिया महोत्सव
पारंपरिक वेशभूषेत दोन हजार महिलांची हजेरी
दांडिया आणि गरब्याच्या तालावर थिरकले सोमनाथ वैद्य
कोणतीही अडचण असू द्या, या भावाला हाक द्या : ऍड. सोमनाथ वैद्य
सोलापूर : उत्साह पूर्ण वातावरणात मांगल्य मंगल कार्यालयात दांडिया जलसा महोत्सव रंगला. पारंपारिक वेशभूषेत सुमारे 2 हजार महिला व मुलींनी उत्स्फूर्तपणे हजेरी लावली. दरम्यान, कोणतीही अडचण असू द्या, या भावाला हाक द्या. मी नेहमी मदतीसाठी तत्पर राहील, अशी ग्वाही स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक एड. सोमनाथ वैद्य यांनी यावेळी दिली.
ग्रोथ डान्सिंग स्कूल प्रस्तुत दांडिया जलसा 2024 हा कार्यक्रम रविवारी मांगल्य सभागृहात मोठ्या उत्साही वातावरणात पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक एड. सोमनाथ वैद्य यांची उपस्थिती होती.
उदे ग अंबे उदे… आई राजा उदे उदे चा नारा देत दांडिया जलसा २०२४ची सुरुवात झाली. प्रारंभी एड. सोमनाथ वैद्य यांच्या हस्ते नटराज मूर्तीचे पूजन करण्यात आले. श्रीफळ वाढवून या दांडिया कार्यक्रमास प्रारंभ झाला.
या दांडियास महिला व मुलींनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. दांडिया आणि गरब्याच्या तालावर हजारो महिला व युवती थिरकल्या. सर्वांसोबत सोमनाथ वैद्य यांनीही ठेका धरला.
या दांडिया मध्ये सुमारे 2 हजार हून अधिक महिलांनी भाग घेतला होता. विविध गाण्यांच्या ठेक्यावर नृत्य करीत उत्तरोत्तर दांडियाची रंगत वाढवली. ग्रोथ डान्सिंग स्कूल प्रस्तुत सर्व संयोजक सहकाऱ्यांनी नेटक्या पद्धतीने नियोजन केले होते.
आरती आणि भोंडल्याने या दांडियाची सुरुवात झाली. पारंपरिक पेहरावात महिला व मुलींनी बहारदार गाणी अशा उल्हास पूर्ण वातावरणात हा दांडिया रंगत गेला. वाद्यवृंदांचा ठेका आणि नेटक्या संयोजनामुळे या कार्यक्रमाला बहर आला होता.
वैविध्यपूर्ण नेपथ्य, आकर्षक रोषणाई, जोशपूर्ण गाणी आणि उत्तम वाद्यवृंदाने सर्वांना आकर्षित केले. नव्या वळणाच्या दांडिया ठेका सादर करून उपस्थितांनी धमाल उडवून दिली. मराठमोळी संस्कृती जोपासत पारंपरिक वेशभूषेत दांडिया खेळून सर्वांचे लक्ष वेधले. या दांडिया जलसा महोत्सवात पारंपरिक वेशभूषा खास आकर्षण ठरली. याप्रसंगी जेष्ठ पत्रकार अभय दिवाणजी आणि व्यंकटेश पटवारी हे सहकुटुंब उपस्थित होते.
आमदार झाल्यानंतर पुढील वर्षी दांडियाला माधुरी दीक्षितला आणूया : ऍड. वैद्य
तब्बल 19 वर्षाचा विधिमंडळ आणि मंत्रालयातील कामाचा तगडा अनुभव आहे. दक्षिण सोलापूर मतदारसंघाचा सर्वांगीण विकास करण्याचे माझे ध्येय आहे. आपले सहकार्य असेच राहू द्या. कोणतीही अडचण असू द्या, या भावाला सर्व लाडक्या बहिणींनी हाक द्यावी. तत्पर मदतीसाठी हा भाऊ तयार आहे. या विधानसभा निवडणुकीत सर्वांनी पाठबळ द्यावे. मी आमदार झाल्यानंतर पुढील वर्षी नवरात्र महोत्सवात दांडियासाठी सिने अभिनेत्री माधुरी दीक्षित यांना आणूया, असे आश्वासन एड. सोमनाथ वैद्य यांनी यावेळी दिले.