गरिबाच्या ‘फ्रीजला’ वाढती मागणी
नाझरे परिसरात उन्हाची तीव्रता वाढली
नाझरे प्रतिनिधी
नाझरे व परिसरात मार्च महिन्यात उन्हाची तीव्रता वाढली असून, थंडाव्यासाठी दिवसेंदिवस थंड पाण्याची मागणी वाढली असून, गरीबाच्या फ्रीजला मागणी वाढत असून त्याच्या किमतीत ही थोडीफार वाढ झाली आहे.
नाझरे तालुका सांगोला येथील सुधाकर लक्ष्मण कुंभार गेली तीस वर्षे कुंभार काम करीत असून, सुगडी, गणपती, गौरी बरोबर डेरा म्हणजेच माठ तसेच रांजण तयार करण्याचे काम करतात. सध्या उन्हाची तीव्रता मार्च महिन्यात वाढत चालली असून आठवडा बाजारात व कुंभारवाड्यात गरीबाच्या फ्रीजला मागणी वाढत असून नागरिकांची माठ खरेदी करण्यासाठी गर्दी ही वाढली आहे. माठा बरोबर ते राजस्थानी नळ माठ, रांजण व वेगवेगळ्या आकाराचे व प्रकारातील माठ विक्रीस असून यंदा शंभर रुपयांपासून तीनशे रुपये पर्यंत माठ तर रांजण आठशे रुपये पासून एक हजार रुपये पर्यंत आहे त्यामुळे किमती थोडीफार वाढ झाली असून तरीही मागणी वाढत आहे.
उन्हाळा सुरू झाला की ग्रामीण भागात घरोघरी माठ दिसायचे व त्यातील पाणी चवदार लागायचे परंतु माठाची जागा आता फ्रिज ने घेतली खरी परंतु त्यामधील पाणी चवदार लागत नाही व थंड पाण्यामुळे सर्दी, खोकला वाढत आहे यासाठी माठाला मागणी वाढत आहे. परंतु याचा करण्याचा खर्चही वाढत आहे.