छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवले 

छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील रस्त्यावरील खड्डे बुजवले 

ॲम्बेसिडर हॉटेल समोरील मोठा खड्डा मात्र जैसे थे 

शहराच्या मुख्य प्रवेशद्वारातील  खड्ड्याचे विघ्न झाले दूर 

सोलापूर : सोलापूर शहराचे मुख्य प्रवेशद्वार मानल्या जाणाऱ्या  छत्रपति संभाजी महाराज चौक ते छत्रपति शिवाजी महाराज चौक पर्यंतचा दोन महिन्यापूर्वीच करण्यात आलेल्या  सुमारे दोन कोटीच्या नव्या रस्त्यावर खड्डे पडल्याची बातमी प्रसिद्ध होताच अखेर महापालिकेने छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील खड्डे बुजवले मात्र ॲम्बेसिडर हॉटेल समोरील मोठा खड्डा मात्र जैसे थे ठेवल्याचे दिसून येते.

          छत्रपति शिवाजी महाराज चौक ते छत्रपति संभाजी महाराज चौक  हा रस्ता अत्यंत वर्दळीचा आहे. मात्र या रस्त्यावर अनेक खड्डे पडलेले असल्यामुळे नागरिकांना त्रास होत होता. अनेक अपघातही या रस्त्यावर घडले होते. खड्डेमय रस्ता आणि धूळ असे विदारक चित्र या परिसरात दिसून येत होते. यामुळे या रस्त्याचे डांबरीकरण करावे अशी मागणी सातत्याने होत होती. त्यामुळे केंद्र सरकारकडून निधी मिळून या रस्त्याचे काम करण्यात आले. केंद्रीय पर्यावरण मंत्रालय अंतर्गत राष्ट्रीय स्वच्छ वायू कार्यक्रमातंर्गत सुमारे दोन कोटी रुपयांच्या निधीतून हे काम करण्यात आले आहे. दि. २९ मार्च २०२४ रोजी या रस्त्याचे काम करण्यात आले.

      दरम्यान, अवघ्या दोनच महिन्यात या नव्या कोऱ्या मुख्य रस्त्यावर छत्रपती संभाजी महाराज चौकात खड्डे पडले. रस्त्याच्या मधोमध मोठे दोन खड्डे पडल्यामुळे वाहनधारकांना या खड्ड्याचा मोठा अडथळा ठरत आहे.  पुढे याच रस्त्यावर ॲम्बेसिडर हॉटेल समोर रस्त्याच्या मधोमधच आणखी एक मोठा खड्डा पडल्याची बातमी वृत्तपत्रात नुकतीच प्रसिद्ध झाली. त्यानंतर महापालिका प्रशासनाने त्याची दखल घेत अखेर आज छत्रपती संभाजी महाराज चौक परिसरातील रस्त्याच्या मधोमध असलेला खड्डा व चर 

डांबरीकरण करून बुजविला. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *