
‘त्या’ बंद रोड स्विपर मशीन आणि परिसराची आरोग्य अधिकाऱ्यांनी केली पाहणी
तातडीने कार्यवाही करण्याच्या
डॉ. राखी माने यांनी दिल्या सूचना
सोलापूर : महापालिकेच्या राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह (डफरीन हॉस्पिटल)च्या आवारात गेल्या अनेक वर्षापासून गंजत पडून असलेल्या 2 रोड स्वीपर मशीन गाड्या आणि परिसराची आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी आज पाहणी केली. तत्काळ कार्यवाही करण्याच्या सूचना संबंधितांना दिल्या आहेत.
महापालिकेच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृहाच्या आवारात बंद असलेल्या 2 रोड स्वीपर मशीन गाड्या धुळखात पडून आहेत. गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी या दोन स्वीपर मशीन वाहन गंजत पडून आहेत. या दोन गाड्या बंद पडल्याने महापालिकेला लाखोचा भुर्दंड झाला. अनेक वर्षे उलटले तरीही दुरुस्ती होतच नसल्याने येथे गाड्या इथेच गंजत पडून आहेत. वाहनांची दुरवस्था झाली आहे. गेल्या अनेक वर्षापासून या स्वीपर मशीन गाड्या हॉस्पिटलच्या मधोमध गंजत पडून असल्याने या वाहनांच्या आजूबाजूला अस्वच्छता निर्माण झाली आहे. यामुळे मच्छर वगैरे निर्माण होत आहे. याबाबत वृत्त प्रकाशित केले होते.
त्या बातमीची दखल घेत महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी आज या राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूतीगृह आवारातील बंद अवस्थेतील दोन स्वीपर मशीन आणि परिसराची पाहणी केली. या ठिकाणी अस्वच्छता दिसून आली. एकूणच विदारक चित्र त्यांना पाहायला मिळाले. या संदर्भात कार्यवाही करण्याच्या सूचनाही आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी दिल्या.
कार्यवाही करण्याचे झोन
कार्यालयाला पत्र : डॉ. माने
राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रसूती गृह आवारातील बंद पडलेल्या दोन स्वीपर मशीन गाड्यांची व परिसराची आज पाहणी केली. अस्वच्छता तिथे आहे. प्रसूती गृह आणि शेजारी कर्मचारी कॉर्टर्स आहेत. स्वच्छता आवश्यक आहे. या गाड्या हलविण्यात याव्यात यासह स्वच्छता करण्यासंदर्भात संबंधित झोन कार्यालयास पत्राद्वारे कळविण्यात येत असल्याचे आरोग्य अधिकारी डॉ. राखी माने यांनी सांगितले.