देवमारे कुटुंबास आर्थिक मदत करत राजाभाऊ खरे यांनी जोपासली सामाजिक बांधिलकी.

पंढरपुर येथे काही दिवसापूर्वी एका तरुणावर कोयत्याने हल्ला झालेल्या घटनेने संपुर्ण पंढरपुर शहर‌ हादरुन गेले होते.
या घटनेमुळे पंढरपूर शहरात पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात दहशत पसरली होती. या घटनेमध्ये गंभीररित्या जखमी झालेल्या. दिनेश धोंडीबा देवमारे या तरुणांच्या कुटुंबाच्या मदतीला अक्षरशा देव म्हणून स्वतः राजाभाऊ खरे हे धावून आले असून त्यांनी दिनेश यांच्या झालेल्या या हल्ल्याप्रकरणी त्या कुटुंबास सावरण्यासाठी स्वतःच्या स्वखर्चातून ५००००/- हजार रुपयाची मदत केली असल्याचे सांगितले जात आहे.
देव मारे कुटुंब हे अत्यंत हलाखीच्या परिस्थितीमध्ये आपले जीवन जगत असताना त्यांच्या घरावरती असा हा दुःखद प्रसंग आलेला असताना पंढरपूर तालुक्यांमध्ये मोठमोठे दानशूर नेते मंडळाचा ना कोणीही कोणत्याही प्रकारची मदत ना देवमारे कुटुंबाला केली ना कोणतीही विचारपूस त्यांना केली पण क्षणाचाही विलंब न लावता व तो माणूस कुठला आहे याचा विचार न करता अक्षरशः देव माणूस म्हणून त्याची आज संपूर्ण जिल्ह्यात ओळख निर्माण केलेले उद्योगपती राजाभाऊ खरे यांनी त्यांच्या कुटुंबाला आर्थिक मदत करत एक मोठा आधार दिला आहे.अशा एक ना अनेक गरजवंत कुटुंबांना मदतीचा आधार देण्याचे काम उद्योगपती राजाभाऊ खरे यांच्याकडून सातत्याने सुरू असून त्यांनी पंढरपूर बरोबरच मोहोळ विधानसभा मतदारसंघातील अनेक कुटुंबांना स्वतःच्या खिशातून मदत देऊन, त्या कुटुंबांना मदतीचा सढळ-हात दिला असल्याचे या प्रसंगावरून तरी अधोरेखित होते.
यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे मित्र भाजपा शहर उपाध्यक्ष अजय देशपांडे हेही उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *