प्लास्टिक विरोधी कारवाईत 65 हजाराचा दंड वसूल
महापालिकेकडून 157 आस्थापनांची केली तपासणी
55 किलो प्लास्टिक जप्त
सोलापूर : महापालिका घनकचरा व्यवस्थापन विभाग तसेच प्लास्टिक विरोधी कारवाईच्या पथकाने शहरातील एकूण 157 आस्थापनांची तपासणी केली. या मोहिमेत 65 हजार रुपये दंड वसूल करत 55 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले.
सोलापूर महापालिका प्रशासनाच्या वतीने आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त मच्छिंद्र घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली शहरात प्लास्टिक विरोधी मोहीम राबविण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत महापालिकेच्या प्लास्टिक विरोधी पथकाकडून दि. 25 ते 27 मार्च 2024 दरम्यान शहरातील बाजारपेठांमध्ये विविध 157 आस्थापना व व्यवसायिकांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये भाजी विक्रेते , फळ विक्रेते, किरकोळ किराणा दुकान व होलसेल प्लास्टिक विक्रेते, व्यवसायिकांची तपासणी करून 55 किलो प्लास्टिक जप्त करण्यात आले. यामध्ये तर 65 हजार रुपये दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे, अशी माहिती घनकचरा व्यवस्थापन विभागाचे मुख्य सफाई अधीक्षक नागनाथ बिराजदार यांनी दिली.
या मोहिमेत आरोग्य निरीक्षक सोमनाथ सिद्धगणेश, विठोबा सिंधीबंदी , इंगळे, आदींसह आरोग्य निरीक्षकांनी कारवाई केली.