बार्शीकरांसाठी खुषखबर पुणे येथे जाण्यासाठी प्रत्येक तासाला विना थांबा एसटी बस सुरु
विना थांबा बस सेवेला दि. 15 मार्च पासून सुरुवात
फक्त कुर्डूवाडी, टेंभुर्णी व हडपसर येथेच थांबा
बार्शी प्रतिनिधी –
बार्शी वरुन पुणे येथे जाण्याऱ्या प्रवाशांना बार्शी आगाराने प्रत्येक एक तासाला विना थांबा एसटी बस सोडण्याचा निर्णय घेतला असून या बस सेवेला दि. 15 मार्च पासून सुरुवात होणार आहे. यामुळे पुणे येथे जाणाऱ्या बार्शीकरांची चांगली सोय झाली आहे. ऐन उन्हाळी सुट्टीत व लग्नसराईमध्ये मोठ्या संख्येने प्रवाशी बांधव ये जा करतात त्यामुळे लवकर पुणेला जाण्यासाठी या सेवेला प्रचंड प्रतिसाद मिळणार आहे. त्यामुळे एसटी महामंळास सर्वाधिक कमाईचा नवा विक्रमच नोंदविता येणार आहे.
पुण्याहून येणाऱ्या बार्शीकरांना पुणे- बार्शी येथे जाण्या येण्यासाठी विनाथांबा बस मुळे लवकर प्रवास होऊन वेळेची बचत होणार आहे.
या बसला फक्त कुर्डूवाडी, टेंभुर्णी व हडपसर येथेच थांबा देण्यात आला आहे. या विना थांबा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना शासनाने दिलेल्या सर्व सवलतीचा लाभ घेता येणार आहे तसेच या नवीन चालू केलेल्या विना थांबा बससेवेला बार्शीकरांनी उस्फुर्त प्रतिसाद द्यावा असे आवाहन बार्शी आगारप्रमुख मधुरा जाधवर यांनी केले आहे.