बार्शीतील भगवंत सेना दलाच्या मदतीमुळे अनेक अपघातग्रस्तांना मिळतेय जीवदान

 मंगळवार दि. 2 मार्च रोजी सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास बार्शी – लातूर रोडवर कुसळंब जवळ अक्षय शितोळे आणि अतिश मस्के वय 25 वर्षे, दोघे राहणार तुगांव, जिल्हा धाराशिव, हे बार्शीकडे येत असताना दुचाकी क्र. एम. एच. 24 बी., व्ही 4010 या दुचाकीचा अपघात होऊन रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडले होते. डोक्याला, हाताला, पायाला लागल्यामुळे दोघेही गंभीर जखमी झाले होते.

 याप्रसंगी भगवंत सेना दलाचे सदस्य शुभम झोंबाडे हे आपल्या कुटुंबासह आपल्या चार चाकी वाहनातून लातूरकडे निघाले होते. रस्त्यावरती रक्ताच्या थारोळ्यामध्ये पडलेल्या युवकांना पाहून त्यांनी लागलीच आपली गाडी बाजूला घेऊन भगवंत सेना दलाचे सेनादल प्रमुख धिरज शेळके यांना सदरील प्रकार फोनवरून सांगितला. यावेळी सेनादल प्रमुख धिरज शेळके यांनी तात्काळ 108 रुग्णवाहिकेला फोन करून अपघातस्थळी बोलावून घेतले. याप्रसंगी 108 क्रमांकाच्या रुग्णवाहिकेचे कर्तव्यदक्ष डॉक्टर सुजित गायकवाड व पायलट गणेश काळे यांनी कसलाही विलंब न रुग्णवाहिका घेऊन घटनास्थळी पोहोच झाले. भगवंत सेना दलाचे शुभम झोंबाडे, सामाजिक कार्यकर्ते राहुल झोंबाडे यांनी जखमी दोन्ही युवकांना रुग्णवाहिकेमधून जवळ असणाऱ्या पांगरी येथील सरकारी रुग्णालयामध्ये पुढील उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी धिरज शेळके यांनी  जखमी युवकांच्या नातेवाईकांना फोन करून सदरील घडलेला प्रकार सांगितला.

 भगवंत सेना दलाच्या माध्यमातून आतापर्यंत 29 अपघातग्रस्तांचे प्राण वाचल्याने सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यातून भगवंत सेना दलाच्या सदस्यांचे कौतुक केले जात आहे. आपल्या परिसरामधील अपघातग्रस्तांच्या मदतीला जाणे हे आपले कर्तव्य असून, अपघातग्रस्तांना योग्य वेळेत मदत मिळाली तर त्यांचा प्राण निश्चित वाचू शकतो, तसेच आपत्कालीन परिस्थितीमध्ये मदतीसाठी 99 22 91 4009 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन भगवंत सेना दल प्रमुख धिरज शेळके यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *