भाजप उमेदवार आ. राम सातपुते यांचे सोलापुरात जंगी स्वागत

भाजप उमेदवार आ. राम सातपुते यांचे सोलापुरात जंगी स्वागत

सालगडी म्हणून सोलापूरकरांची सेवा करणार : सातपुते

जय श्रीराम च्या जयघोषात केली पुष्पवृष्टी

सोलापूर :  मी बाहेरचा आयात उमेदवार हे म्हणणे म्हणजे हास्यास्पद आहे. हा काँग्रेसचा नैतिक पराभवच आहे.  सुशीलकुमार शिंदे, शरद पवार यांनी विविध ठिकाणी निवडणुका लढवल्या, ते बाहेरचे उमेदवार होते का असा सवाल उपस्थित करत या मातीत माझं बालपण गेले आहे. सालगडी म्हणून सोलापूरकरांची सेवा करणार अशी ग्वाही भाजपचे सोलापूर लोकसभा मतदारसंघातील उमेदवार आमदार राम सातपुते यांनी येथे दिली.

      सोलापूर लोकसभा राखीव मतदार संघातील भाजपचे उमेदवार आमदार राम सातपुते यांचे आज सोलापुरात छत्रपती संभाजी महाराज चौक येथे जंगी स्वागत करण्यात आले. जय श्रीराम जयघोषात पुष्पवृष्टी करून त्यांचे स्वागत झाले. छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्यास उमेदवार राम सातपुते यांनी अभिवादन केले. त्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते. 

      आयात उमेदवार बाबत बोलताना आ. सातपुते पुढे म्हणाले,  या सोलापूर लोकसभा मतदारसंघासाठी पक्षाने माझ्यासारख्या सामान्य परिवारातील सामान्य कार्यकर्त्याला संधी दिली. माझ्या आई-वडिलांनी श्री सिद्धेश्वर साखर कारखाना, दामाजी साखर कारखाना, श्री विठ्ठल साखर कारखाना यामध्ये ऊस तोडण्याचे काम केले आहे. या मातीची सेवा केली आहे. या मातीतच माझं बालपण गेले आहे. त्यामुळे मी बाहेरचा कसा ? त्या उलट सुशील कुमारशिंदे यांनी करमाळा पासून ते इतर विविध मतदारसंघातून आतापर्यंत निवडणुका लढवल्या आहेत. ते बाहेरचेच होते का ? त्याही पुढे जाऊन शरद पवार यांनी बारामतीतून येऊन माढा लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली. त्या निवडणुकीत सुशीलकुमार शिंदे यांनी प्रचार केला. ते बाहेरचे आयात उमेदवार होते का ? ते कसे काय चालले असा सवाल आमदार सातपुते यांनी यावेळी उपस्थित केला.

      उस्मानाबाद जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील हा शिंदे परिवार येथे आला. याउलट आमच्या आई-वडिलांनी सोलापुरातील विविध कारखान्यात ऊसतोड कामे केली. या मातीची सेवा केली. माझे बालपण या मातीतच गेले. असे असताना मी बाहेरचा म्हणणे म्हणजे हास्यास्पद गोष्ट आहे. हा काँग्रेसचा नैतिक पराभव आहे, असेही आमदार सातपुते म्हणाले.

     महायुतीतील सर्व घटक पक्षाचे पदाधिकारी – कार्यकर्ते यांनी माझे जंगी स्वागत केले. त्यांच्या सर्वांच्या खांद्याला खांदा लावून या निवडणुकीत कानाकोपऱ्यात जाऊन प्रचार करण्यात येणार आहे. सर्व नेत्यांच्या घरी जाऊन मी आशीर्वाद घेणार आहे. या मतदारसंघात विकासाची गंगा नेणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या विकास कामांची री या मतदार संघात ओढणार आहे. गेल्या दहा वर्षात येथील दोन्ही खासदारांनी मोठ्या प्रमाणात विकास कामे केली. याही पुढे अशीच विकास कामे केली जातील, अशी काही यावेळी आमदार राम सातपुते यांनी दिली.

        यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार सचिन कल्याण शेट्टी, सोलापूर शहराध्यक्ष नरेंद्र काळे, सोलापूर लोकसभा समन्वयक विक्रम देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार, शिवसेनेचे( शिंदे गट) जिल्हाप्रमुख मनिष काळजे, माजी मंत्री लक्ष्मण ढोबळे, विक्रम देशमुख, युवा नेते मनीष देशमुख, माजी जिल्हाध्यक्ष अशोक वाघमारे, सोमनाथ केंगनाळकर,  शशिकांत चव्हाण, दिलीप पतंगे, माजी महापौर शोभा बनशेट्टी, श्रीकांचना यन्नम, इंदिरा कुडक्याल , विशाल गायकवाड, सागर आतनुरे, सोमनाथ आवताडे, अक्षय अंजिखाने, राजा माने, हेमंत पिंगळे, अनिल चव्हाण, राजश्री चव्हाण, इंदिरा कुडक्याल, योगेश कबाडे, किरण पवार, श्रीनिवास करली, विकास वाघमारे, बाळू आळसंदे, संजय कोळी, राजकुमार पाटील, अनिल कांदलगी, नागेश खरात यांच्यासह भाजप, शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    दरम्यान त्यानंतर शहरातील विविध महापुरुषांच्या पुतळ्यास अभिवादन करत रॅली काढण्यात आली. मार्कंडेय उद्यानातील स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करून या ठिकाणी सभेने सांगता करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *