मनपा पांढरेवस्ती शाळेत कलेतून महिला दिन साजरा
सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून मनपा पांढरेवस्ती शाळेत रांगोळी या कलाकृतीतून महिलांचे विविध रूपे आणि समाजातील स्थान याविषयी माहिती देण्यात आली.ही रांगोळी कलाशिक्षिका वृषाली खराडे व शाळेतील मुलींनी मिळून काढली.
याप्रसंगी कलाशिक्षिका वृषाली खराडे यांनी विद्यार्थ्याना रांगोळीचे प्रात्यक्षिक महिलांच्या कुटुंबातील निभावत असलेल्या वेगवेगळ्या भूमिका माहिती दिली तसेच जबाबदारी आणि कुटुंबाला एकत्र ठेवण्यासाठी या सर्व नात्यांचा उपयोग कसा होतो या विषयी माहिती दिली.
शाळेचे मुख्याध्यापक अमोल भोसले यांनी महिलांचे समाजातील स्थान व सध्या उच्च पदावर असणा-या विविध महिलाविषयी विद्यार्थ्यांना माहिती दिली. सध्या प्रत्येक क्षेत्रात महिला अघाडीवर आहेत, असेही यावेळी सांगितले
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अमोल भोसले,किरण शेळगे,श्रीदेवी गौडगावे,अफरीन शेख यांनी परिश्रम घेतले.