मनपा शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर कार्यवाही करावी 

मनपा शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यांवर कार्यवाही करावी 

महापालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीचे उपायुक्तांना निवेदन

सोलापूर : महापालिका कार्यक्षेत्रात कार्यात असणाऱ्या मनपा शाळेतील शिक्षकांचे विविध प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रश्नांची सोडवणूक करून शिक्षकांना न्याय मिळावा. या मागणीसाठी महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने आज महापालिका उपायुक्त तैमूर मुलाणी यांना

निवेदन देण्यात आले. 

        महानगरपालिका प्राथमिक शिक्षक समन्वय समितीच्या वतीने पदाधिकाऱ्यांनी उपायुक्तांची भेट घेऊन त्यांना विविध मागण्या संदर्भात निवेदन  दिले. या शिक्षक प्रलंबित शिक्षक मागण्या संदर्भात चर्चा करण्यात आली. मुख्याध्यापक पदोन्नती मिळावी.विज्ञान व भाषा पदवीधर नियुक्ती करण्यात यावी. 

 शिक्षक विनंती बदली करावी. बीएससी  करत असलेल्या शिक्षकांना विज्ञान पदवीधर नियुक्ती करावी आदी मागण्यांच्या यामध्ये समावेश आहे.  या प्रश्नाच्या सोडवण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन उपायुक्त तैमूर मुलाणी यांनी समन्वय समिती शिष्टमंळाला दिले.

       शिक्षक प्रश्नासोबतच महापालिका शाळांचा विद्यार्थी पट वाढवण्याबाबत तसेच गुणवंत वाढीसाठी शिक्षक यांनी पालकांचा समाजातील विविध घटकांचा तसेच एनजीओचा सहभाग घ्यावा व ज्या ठिकाणी महापालिकेच्या आवश्यकता असेल त्या ठिकाणी प्रत्यक्ष तथा उपस्थित राहील त्यामुळे शिक्षकांनी प्रश्नांबरोबर शाळेच्या गुणवत्ता, पट वाढीसाठी अधिक प्रयत्न करावे, अशी अपेक्षा उपायुक्त मुलाणी यांनी व्यक्त केली.

       या शिष्टमंडळामध्ये समन्वय समितीचे निमंत्रक अमोल भोसले, सहनिमंत्रक इमरान पठाण , मार्गदर्शक नागेश गोसावी, फजल शेख, संघटक कृष्ण सुतार, विशाल  मनाळे, विजय टेकाळे, केशव गलगले, मौला जमादार आदी उपस्थितीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *