सोलापूर (प्रतिनिधी) जमिनीच्या शाश्वत उत्पादकतेसाठी मुख्यतः पोषक तत्वांचा पुरेसा आणि संतुलित प्रमाण वापर करणे आवश्यक असते,ज्यामुळे उच्च पोषक प्रतिसाद देणाऱ्या ऊस पिकाची योग्य वाढ होते आणि शेवटी अधिक उत्पादन मिळते.जमिनीची शाश्वतता भौतिक,रासायनिक आणि जैविक गुणधर्मांसारख्या प्राकृतिक सुपीकता ठरविणाऱ्या घटकांवर अवलंबून असते.वापरलेल्या खतांच्या मात्रेची कार्यक्षमता नायट्रोजन,फॉस्फरस,पोटॅशियम,सेंद्रिय सामग्री, सूक्ष्म पोषक घटक आणि पाण्याच्या गुणवत्तेवर अवलंबून असते.हे सर्व घटक सध्या अतिशय विषम (जास्त किंवा कमी) प्रमाणात वापरले जात होते आणि वापरली जात आहेत ज्यामुळे जमिनीत पोषक तत्वांची कमतरता दिसून येत आहे आणि परिणामी जमिनीचा ऱ्हास होत चाललेला आहे.मातीतील किमान पोषक तत्त्वांचे प्रमाण पुरेशा प्रमाणात न राखले गेल्याने,पोषक तत्त्वांची कमतरता, रोपांची कमजोर वाढ आणि कृषि उत्पादकतेत घट होऊ शकते.डॉ.प्रकाश गवडा,जनरल मॅनेजर,आरअँड डी पीक पोषण व्यवसाय.महाधन अॅग्रीटेक लिमिटेड,पुणे सांगतात कि, शाश्वत शेतीसाठी संतुलित पीक पोषण हा महत्त्वाचा उपाय आहे: खतांचे वेळापत्रक तयार करणे,योग्य वेळी खतांचे योग्य मिश्रण मिळणे,शास्त्रीय शिफारस आणि मातीची पोषक तत्त्वे यांच्या आधारे योग्य प्रमाणात गणना करता येणे,आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्यांना योग्य संसाधनांचाही पुरेसा आधार मिळत नसल्याने या सर्व बाबींमध्ये शेतकरी तज्ञ नसतात.बहुतेक शेतकरी त्यांच्या शेतीच्या उपायांसाठी प्रामुख्याने सामग्री पुरविणाऱ्या स्थानिक डीलर्सवर अवलंबून असतात, जे त्यांच्यासाठी योग्य आणि किफायतशीर असू शकतात किंवा नसतात. अशा परिस्थितीत, शेतकऱ्यांकडे त्यांच्या सर्व समस्यांच्या मुद्द्यांची काळजी घेऊन त्यांचे निवारण करण्यासाठी पोषण समाधान सहज उपलब्ध असले पाहिजे.
अजय मधुकर कानवडे,मौजे निमगाव बु,तालुका: संगमनेर, जि.अहमदनगर, हे सांगतात कि ते पूर्वी ऊस पिकासाठी पारंपरिक पद्धतीने खते देत होते परंतु मी २०२२ -२३ मध्ये त्यांनी आडसाली ऊसासाठी महाधन क्रॉपटेक शुगरकेन ९:२४:२४ या खताचा वापर केल्यामुळे, फुटव्यांची संख्या वाढली (१०-१२), एकसारखे जोमदार फुटवे मिळाले,ऊसावर काळोखी एकसारखी टिकून राहीली , पेऱ्यांची लांबी सुद्धा वाढली याचा परिणाम म्हणून एकरी ८ टन उत्पादन जास्तीचे वाढून मिळाले त्यामुळे मी खूप आंनदी आहे. सरासरी ऊसाच्या वजनामध्ये १ किलोचा फरक मला जाणवला. महाधन क्रॉपटेक शुगरकेन ९:२४:२४ खताच्या एकाच दाण्यात ऊस पिकासाठी आवश्यक असलेले ०८ पोषक घटक संतुलित प्रमाणात असल्याने मला दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्ये खते वेगळी विकत घेण्याची गरज पडलीच नाही त्यामुळे खते मिक्स करण्याचा त्रास वाचला आणि वेळेची आणि मजुरी खर्चात देखील बचत झाली,एकंदरीत खतावर होणारा खर्च कमी झाला आहे.हा महाधन क्रॉपटेक शुगरकेन ९:२४:२४ चा आलेला उत्कृष्ठ रिझल्ट पाहता माझी ऊस बागायतदाराना विनंती आहे कि त्यांनी सुद्धा आपल्या ऊस पिकासाठी महाधन क्रॉपटेक शुगरकेन ९:२४:२४ या खताचा वापर करावा.