
महापालिका तिजोरीत २५.११ लाख रूपये मिळकत कर भरणा
शहरात विविध ठिकाणचे ३ नळ तोडले
सोलापूर : मिळकत करापोटी महापालिकेच्या तिजोरीत दिवभरात २५ लाख ११ हजार ३०२ रुपये कर भरणा झाला . थकबाकीपोटी दिवसभरात शहरातील विविध मिळकतींवरील ३ नळ तोडण्यात आले.
महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई मोहीम सुरू आहे.थकबाकी वसुली व नळतोडणी मोहीम यापुढेही सुरू राहणार आहे.
महापालिकेच्या मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी गेल्या २३ दिवसांपासून कारवाई वसुली मोहीम राबविण्यात येत आहे. थकबाकी पोटी शनिवारी शहरातील ३ नळ तोडण्याची कारवाई करण्यात आली.
पथकनिहाय वसुली व कारवाई
पथक १ – ४४ हजार ५६४ रुपये ,
पथक २ – ६५ हजार रुपये,
पथक ३ – २ लाख ८४ हजार ५२५ रुपये,
पथक ५ – ६३ हजार २४० रुपये,
पथक ६ – ६ लाख २९ हजार १९९ रुपये,
पथक ७ – २ लाख ९५ हजार २८९ रुपये,
पथक ९ – १ लाख १ हजार रुपये – ३ नळ बंद केले.
शनिवारी दिवसभरात विविध वसुली पथकांनी एकूण १४ लाख ८२ हजार ८१७ रुपये वसुली केली.महापालिका कर संकलन केंद्र व इतर विविध प्रकारे शनिवारी दिवसभरात २५ लाख ११ हजार ३०२ रुपये मिळकत कर भरणा महापालिका तिजोरीत जमा झाला.
थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.