विविध उपक्रमांने केला जागतिक हिवताप दिन साजरा
सोलापूर : महापलिका मलेरिया विभागातर्फे
जागतिक हिवताप दिनानिमित्त ‘गुणवंत कर्मचारी सत्कार समारंभ, प्रभात फेरी, वाहनाद्वारे बोलक्या जाहिराती, बॅनर्स, पोस्टर्स, मायकिंग आदी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
२५ एप्रिल हा दिवस जागतिक हिवताप दिन (वर्ल्ड मलेरिया डे) म्हणून दरवर्षी जगभरामध्ये साजरा करण्यात येतो. त्या अनुषंगाने सहा. संचालक डॉ.सारणीकर , महापालिका उपायुक्त तथा नियंत्रण अधिकारी आशिष लोकरे , जिल्हा हिवताप अधिकारी बागल यांच्या मार्गदर्शनाखाली महापालिका नागरी हिवताप योजना यांच्या वतीने विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. आज नागरी आरोग्य केंद्र दाराशा मनपा सोलापूर येथे हिवताप जनजागरण प्रभात फेरी काढण्यात आली. यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. मंजिरी कुलकर्णी या उपस्थित होत्या.
कीटकजन्य आजार रोखण्यासाठी प्रतिबंध हीच प्रभावी उपाय योजना ठरु शकते.याची जाणीव जनजागृती नागरिकांमध्ये निर्माण करणे आवश्यक आहे. यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील याबाबत आरोग्यअधिकारी कुलकर्णी यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.
या प्रसंगी दाराशा नागरी आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. चौगुले व सर्व स्टाफ, जीवशास्त्रज्ञ सोमनाथ गायकवाड, आरोग्य निरीक्षक समीर हुडेवाले , कृष्णा घंटे, गणेश माने , जहूर यादगीर व सर्व वरिष्ठ क्षेत्र कार्यकर्ते, कीटक संहारक व सर्व क्षेत्र कार्यकर्ते उपस्थित होते.
नागरिकांनी अशी घ्यावी काळजी
कोरडा दिवस पाळणे,वापरावयाचे पाणी झाकून ठेवणे व ती भांडी आठवड्यातून किमान एकवेळा कोरडे व स्वच्छ करून, भरणे, फूलदाणी, टायर, बिनकामी भंगार, करवंट्या, फ्रिज, कुलर या ठिकाणी पाणी साठू न देणे, तुंबलेली डबकी, गटारे,यांचे पाणी वाहते करणे किवा त्यावर टेमिफॉस किंवा खराब ऑईल टाकणे, शक्य असेल त्या पाणी साठ्यामध्ये गप्पी मासे सोडणे , दारे खिडक्यांना जाळ्या बसवणे , मच्छरदाणीचा वापर करणे व ताप आल्यास त्वरित जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जावे, असे आवाहन मनपा व जिल्हा हिवताप विभागातर्फे करण्यात आले.