
महापालिकेच्या वतीने पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांना अभिवादन
सोलापूर : सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या जयंतीनिमित्त इंद्रभुवन येथील पुण्यश्लोक आप्पासाहेब वारद यांच्या पुतळ्यास तसेच कौन्सिल हॉल येथील कार्यालयात त्यांच्या प्रतिमेस महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
यावेळी माजी कुलगुरू इरेश स्वामी, मल्लिकार्जुन कावळे, माजी नगरसेवक प्रभाकर जामगुंडे, विभागीय अधिकारी अंत्रोळीकर, प्रकाश सावंत, कामगार कल्याण व जनसंपर्क अधिकारी विठ्ठल कस्तुरे, सुवर्णा मिरजकर , नरेंद्र गंभीरे, राजेंद्र मायनाळ मल्लिनाथ पाटील, अनुप्रिता अंधेली , राहुल पावले, बाबुराव महेंद्रकर , एस. एस. मंगळूरे आदी मान्यवर उपस्थित होते.