महिलांच्या सन्मानासाठी आ. प्रणिती शिंदे यांना खासदार करा 

filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 7864320;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: null;temperature: 47;

बेरोजगारीमुळे काँग्रेसने दिलेल्या पेन्शनवर बाप मुलांना जगवत आहे

महिलांच्या सन्मानासाठी आ. प्रणिती शिंदे यांना खासदार करा 

काँग्रेसच्या विविध सेलच्या मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांचे आवाहन 

सोलापूर : देशभरात महागाई, बेरोजगारी वाढली आहे. सामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. काँग्रेसने दिलेल्या पेन्शनवर बाप मुलांना जगवत आहे असे विदारक चित्र दिसून येत आहे अशी टीका करतानाच सोलापूर लोकसभा मतदारसंघात महिलांच्या सन्मानासाठी काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांना खासदार करावे, असे आवाहन काँग्रेसच्या विविध विभाग सेलच्या मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांनी केले आहे.

          लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने काँग्रेस पक्षातील विविध 43 विभाग आणि सेलचे प्रमुख पदाधिकारी राज्यभरात विविध मतदारसंघात काँग्रेसच्या ध्येयधोरण आणि विकास कामांची माहिती देण्याचे अभियान राबवत आहेत. हे सर्व पदाधिकारी सोलापुरात आले असताना आज रविवारी आयोजित पत्रकार परिषदेत मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांनी विविध विषयांवर आपली भूमिका स्पष्ट केली. 

           काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या आदेशानुसार काँग्रेसच्या विविध विभाग व सेलचे पदाधिकारी गेल्या 26 मार्चपासून हे अभियान प्रत्येक मतदारसंघात राबवीत आहेत. काल सोलापूर जिल्ह्यात ते आले. काँग्रेस उमेदवारांना निवडून आणण्यासाठी प्रत्येक सेल थेट लोकांपर्यंत घरोघरी जाऊन काँग्रेसचे गॅरंटी कार्ड लोकांना देत आहे. थेट प्रचार यंत्रणा राबविली जात आहे. या अभियानांतर्गत लोकांच्या मनात परिवर्तन होत असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेस बाबत सकारात्मक मत लोकांमध्ये आहे. देशातील महागाई आणि बेरोजगारी याबाबत मतदारांमध्ये प्रचंड चीड निर्माण झाली आहे. लोकांच्या मनातील भावना जाणून घेण्याचे प्रयत्नही सेलच्या माध्यमातून या अभियानाच्या माध्यमातून केले जात असल्याचे प्रज्ञा वाघमारे यांनी सांगितले. 

        देशात महागाई आणि बेरोजगारीने कळस गाठला आहे. काँग्रेसने दिलेल्या पेन्शनवर आजही निवृत्त बाप आपल्या मुलांना पोसत आहे अशी विदारक परिस्थिती आहे. मोदी सरकारने काय केले हे यावरून स्पष्ट होते असा आरोप प्रज्ञा वाघमारे यांनी केला.

       ईडीसह विविध शासकीय यंत्रणेच्या दबावाने काँग्रेसचे नेत्यांना भाजपात घेऊन गेले. फक्त नेते भाजपात गेले असून जनता मात्र आजही काँग्रेस सोबतच आहे, असे विजयकुमार हत्तुरे यांनी स्पष्ट केले. 

        या अभियानाच्या अंतर्गत सोलापूर लोकसभा मतदारसंघात कालपासून लोकांशी संपर्क साधण्यात येत आहे. यादरम्यान सोलापुरात काँग्रेसच्या उमेदवार आ. प्रणिती शिंदे यांच्या बाबत सकारात्मक वातावरण आहे. लोकांमध्ये उत्साह दिसून येत आहे. प्रणिती शिंदे यांनी गेल्या पंधरा वर्षात आमदार म्हणून विविध कामे केली आहेत. घरापासून दारापर्यंतचे प्रश्न सोडविण्यासाठी, सर्व योजनांची अंमलबजावणी करण्याकरिता आ. प्रणिती शिंदे या निवडून येणे आवश्यक आहेत. सोलापूरकरांनी महिलांचा सन्मान करण्यासाठी आणि येथील महिलांनी महिलांना पुढे नेण्यासाठी आ. प्रणिती शिंदे यांना खासदार करावे, असे आवाहन यावेळी प्रज्ञा वाघमारे यांनी केले. 

         काँग्रेसने आपल्या सत्तेच्या कार्यकाळात समाजातील विविध घटकांसाठी योजना राबविल्या. त्याचा लाभ सर्वांना दिला. आजही त्या योजनांची गरज असल्याचे लोक सांगतात, असे प्रदेश प्रवक्ते प्रा. काकासाहेब कुलकर्णी यांनी सांगितले. 

         या पत्रकार परिषदेस छगन पाटील, 

योगेश मसलगे – पाटील, सुरेश यादव, डॉ. मनोज राका, डॉ. हेमंत सोनारे ,भागेश देसाई , 

अप्पू शेख आदींसह पदाधिकारी उपस्थित होते.

मतदान कोणाला केले याची खात्री करा 

सर्व मतदारांनी मतदान करावे. प्रत्येक मतदारांनी आपण कुणाला मतदान केले याची खात्री व्हीव्हीपॅट चिट्टीवर करावी. खात्री झाल्यानंतरच मतदान केंद्राबाहेर पडावे, असे आवाहन मुख्य संयोजिका प्रज्ञा वाघमारे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *