महिलांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे :
अभियंता धनशेट्टी
अभियंता दिन उत्साहात साजरा
सोलापूर : महिलांनी उच्च शिक्षणाला प्राधान्य द्यावे. उच्चपदी कार्यरत राहावे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी
भारतरत्न सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांच्या जयंतीनिमित्त सर विश्वेश्वरय्या को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी जुळे सोलापूर येथे अभियंता दिन साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभाग सोलापूरचे कार्यकारी अभियंता संजय धनशेट्टी हे बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी अभियंता अजय शिंदे होते.
कार्यक्रमाची सुरुवात सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमा पूजनाने व दिप प्रज्वलनाने झाली. त्यानंतर सोसायटीचे नूतन चेअरमन
प्राचार्य डॉ. आशा रोकडे , सचिव
मोहन कांबळे तर खजिनदार
अभिमन्यू कसबे यांचा आणि प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला.
कुमारी संजुक्ता रमेश खाडे हिने वार्विक विद्यापीठ लंडन येथे पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश मिळविल्याबद्दल तिचा सत्कार सोसायटीच्यावतीने करण्यात आला आणि तिला भावी शिक्षणासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. त्यानंतर रमेश खाडे, डॉ. सुहास उघडे यांनी आपली मनोगते व्यक्त केली.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे संजय धनशेट्टी म्हणाले की, पारंपरिक शिक्षणाऐवजी व्यावसायिक शिक्षण घेणे ही काळाची गरज आहे.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक अजय शिंदे यांनी केले. सूत्रसंचालन दत्तात्रय डोलारे यांनी केले तर आभार प्रदर्शन जयश्री राजपूत यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी वसंत नाईकनवरे , क्षीरसागर, कोकणे यांनी परिश्रम घेतले.