विद्यार्थ्यांनी आपली कलचाचणी करावी : गुडेवार
दहावी-बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर
सोलापूर : विद्यार्थ्यांनी करिअर निवडण्यापूर्वी आपली क्षमता, संधी ओळखावी. आपला कल तपासावा. नंतरच आपला करिअर निश्चित करावा. त्याचा उज्वल भविष्यासाठी निश्चितच उपयोग होईल, अशा मौलिक सूचना सोलापूर महापालिकेचे माजी आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी केल्या.
पूर्व विभाग सार्वजनिक वाचनालय व विद्यार्थी मित्र डॉट ऑर्गनायझेशन यांच्या संयुक्त विद्यमाने विद्यार्थ्यांसाठी आयोजित मार्गदर्शन शिबिरात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते. यावेळी व्यासपीठावर
विद्यार्थी मित्र डॉट ऑर्गनायझेशनचे संचालक
रवींद्र कमटम, या ऑर्गनायझेशनचे व्यवस्थापक पवन खामगावकर,
महाराष्ट्र राज्य एसबीसी महासंघाचे निमंत्रक अशोक इंदापुरे, माजी महापौर जनार्दन कारमपुरी आदींची प्रमुख उपस्थिती होती.
प्रास्ताविक वाचनालयाचे विश्वस्त जनार्दन कारमपुरी यांनी केले. कार्यवाह अरविंद चिनी यांनी आभार प्रदर्शन केले. सूत्रसंचालन सांस्कृतिक मंडळ प्रमुख गीता सादूल यांनी केले. कार्यक्रमास विश्वस्त यल्लादास गज्जम, संस्थेचे सहकार्यवाह विजयकुमार गुल्लापल्ली, सांस्कृतिक प्रमुख गीता सादूल, विश्वस्त यल्लप्पा येलदी, विवेक शिंदे, गणपत कुरापाटी, वासुदेव इप्पलपल्ली, ॲड. मनोज पामूल ॲड श्रीनिवास कटकूर इंजिनिअर समीर राऊळ यांची प्रमुख उपस्थिती होती.
शिबीर यशस्वी होण्यासाठी तिरुपती विडप श्रीनिवास कोंपेल्ली नरेश बोनाकृती यांनी परिश्रम घेतले. पूर्व भागातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घेतला.