मिळकतकर थकबाकी पोटी शहरातील 4 मिळकती सील 

मिळकतकर थकबाकी पोटी शहरातील 4 मिळकती सील 

विविध वसुली पथकांकडून 12  नळ तोडले

दिवसभरात महापालिका तिजोरीत 37.97  लाखाचा भरणा

सोलापूर  : मिळकत कर थकबाकी पोटी आज महापालिकेच्या पथकाकडून एका हायस्कूलमधील चेअरमनचे कार्यालय , एक कारखाना तर दोन गाळे सील करण्यात आले आहेत. महापालिका मिळकत कर विभागाच्या विविध पथकांकडून  विविध मिळकतींवरील 12 नळ तोडण्यात आले. आज दिवसभरात 37 लाख 97 हजार 903 रुपये विविध पथकांकडून कर वसूली करण्यात आली.

         महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत  कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई मोहीम गेल्या दहा दिवसापासून सुरू आहे.

       दरम्यान, आज अकराव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी  कारवाई केली. यामध्ये सोलापूर शहरातील मुरारजी पेठ येथील आबासाहेब कणसे यांच्या दोन लाख 17 हजार 16 रुपये इतक्या थकबाकी पोटी गाळा सिल केला आहे. याच पेठेतील अब्दुलखा महंमदखा यांची दोन लाख 18 हजार 935 इतक्या थकबाकी पोटी गाळा सिल करण्यात आला आहे. येथील सोलापूर जिल्हा हायस्कूल, चेअरमन सुरेश रामचंद्र पाटील यांच्या कडील सहा लाख 70 हजार 81 रुपये थकबाकी पोटी कार्यालयाला सील ठोकण्यात आले आहे. उत्तर सदर बाजार येथील लक्ष्मीबाई नारायण पोबत्ती यांची एक लाख 70 हजार 139 रुपये इतक्या थकबाकी पोटी कारखाना सील केला आहे. असे एकूण विविध ठिकाणच्या चार मिळकती सील करण्यात आल्या आहेत. तर 12 नळ तोडण्यात आले आहेत.

       आज पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद  कारवाई याप्रमाणे – पथक क्रमांक 1 – वसुली 6 लाख 79 हजार  753 रुपये, पथक क्रमांक  2 – वसुली 1 लाख 56 हजार रुपये  – 3 नळ कट, पथक क्रमांक 3 – वसुली 78 हजार 172 रूपये, पथक क्रमांक  4- वसुली –  2 लाख 68 हजार 720 रुपये व 4 नळ कट , पथक क्रमांक  -5 – वसुली  40 हजार रुपये, पथक क्रमांक-6 वसुली 6 लाख 1

19 हजार 900 रुपये व 1  नळ कट, पथक क्रमांक -7- वसुली 1 लाख 53 हजार 306 रुपये, पथक क्रमांक -8 – वसुली 18 लाख 2 हजार 52 रुपये व 4 नळ कट, पथक क्रमांक -9 – 000. आजचा एकूण भरणा 37 लाख 97 हजार 903 रुपये झाला आहे. तर 12 मिळकतीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

       थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *