मिळकत कर वसुलीसाठी

मुरारजी पेठेतील एका कॉटेजसह 6 गाळे केले सील 

मिळकतकर  वसुलीसाठी 6  नळ तोडले

महापालिकेच्या पथकांकडून 31.05 लाखाची वसूली 

सोलापूर  : मिळकत कर थकबाकी पोटी  महापालिकेच्या वसुली पथकाकडून आज मुरारजी पेठ येथील समृद्धी कॉटेजसह 6 गाळे सील करण्यात आले. विविध मिळकतींवरील 6 नळ तोडण्यात आले. आज दिवसभरात 31 लाख 5 हजार 674 रुपये विविध पथकांकडून कर वसूली करण्यात आली.

         महापालिका आयुक्त शितल तेली – उगले यांच्या आदेशानुसार उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि मिळकत  कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध पथकाच्या माध्यमातून मिळकत कर थकबाकी वसुलीसाठी सील व नळ बंद कारवाई मोहीम गेल्या 13 दिवसापासून सुरू आहे.

       दरम्यान, आज चौदाव्या दिवशी सोलापूर शहरात विविध ठिकाणी वसुली पथकांनी  कारवाई केली. 6 नळ तोडण्यात आले आहेत. तर मुरारजी पेठ येथील 6 गाळे व 1 कॉटेज सिल करण्यात आले आहेत.

       आज पथक निहाय केलेली वसुलीची रक्कम आणि नळ बंद  कारवाई याप्रमाणे – पथक क्रमांक 1 – वसुली 6 लाख  84 हजार 700 रुपये – नळ बंद, पथक क्रमांक  2 – वसुली 2 लाख 6 हजार 424  , पथक क्रमांक 3 – वसुली 2 लाख 88  हजार 480 रूपये, पथक क्रमांक  4- वसुली – 3 लाख 1 हजार 560 रुपये  , पथक क्रमांक  -5 – वसुली 1 लाख 47 हजार 53 रुपये, पथक क्रमांक-6 वसुली 9 लाख 17 हजार 215, पथक क्रमांक -7- वसुली 2 लाख 92 हजार 515 रुपये – 2 नळ बंद , पथक क्रमांक -8 – वसुली- 2 लाख 23 हजार 975 रुपये- 2 नळ बंद  , पथक क्रमांक -9 – वसूली – 43 हजार 752 रूपये – 1 नळ बंद केला. आजचा एकूण भरणा 31 लाख 5 हजार 674 रुपये झाला आहे. तर 6 मिळकतीवरील पाणीपुरवठा बंद करण्यात आला आहे.

       थकबाकीदारांनी कारवाई टाळण्यासाठी आपली मिळकत कराची थकबाकी भरून महापालिका प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन उपायुक्त आशिष लोकरे यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *