
रस्ता नव्याने करा अन्यथा एसटी वाहतूक बंद करणार
माजी गटनेते आनंद चंदनशिवे यांचा इशारा
सोलापूर : सम्राट चौक ते जुना कारंबा नाका हा रस्ता एस.टी. च्या वाहतुकीमुळे खराब झाला असून तो रस्ता नव्याने करण्यात यावा अन्यथा एस.टी. वाहतूक बंद करण्याचा इशारामाजी गटनेते आनंद चंदनशिवे यांनी दिला आहे. दरम्यान, या रस्त्याची अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे यांनी पाहणी केली.
सम्राट चौक ते जुना कारंबा नाका ते बलदवा कॉर्नर व ॲम्बेसेंडर हॉटेल पर्यंतचा हा रस्ता प्रचंड रहदारीचा आहे. या रस्त्यावरुन एस.टी. महामंडळाच्या सोलापूर शहरातुन बाहेर पडतात. यापुर्वी एस.टी. महामंडळाच्या बसेस हे छत्रपती शिवाजी महाराज चौकातून वळून घेऊन संभाजी महाराज चौकातुन शहराच्या बाहेर पडत होत्या. वाहतुक विस्काळीत होते. याचा ह्या परिसरातील नागरीकांना प्रचंड मोठ्या प्रमाणात त्रास होतो. सम्राट चौक ते जुना कारंबा नाका या ठिकाणी वाहतुक वळविल्यामुळे सदरच्या रस्त्याच्या कडेला जड वाहतुक प्रचंड प्रमाणात होत असल्याने रस्त्याचे मजबुतीकरण करण्यात आले नसल्याने हा रस्ता खराब झाला आहे. हा रस्ता बुधवार पेठ परिसरात 15 ते अधिक शाळा, कॉलेज, महाविद्यालये व उत्तर तालुक्यातील 22 गावांना जोडला असुन मोठ्या प्रमाणावर नागरीक ह्या रस्त्याचा वापर करतात. एस.टी. महामंडळाच्या प्रचंड वाहतुकीमुळे ह्या रस्त्याची ड्रेनेज लाईन सातत्याने फुटत असते. यावेळी महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजेे येथील रस्त्याच्या अवस्थेची माहिती दिली. माजी गटनेते आनंद चंदनशिवे, विभागीय अधिकारी अविनाश अंत्रोळीकर, उप अभियंता प्रकाश दिवाणजी , आवेक्षक विष्णू कांबळे, बांधकाम विभागाचे उपअभियंता, नीलकंठ मठपती, आवेक्षक श्याम कन्ना , कनिष्ठ अभियंता महेश मणियार, कनिष्ठ अभियंता अभिजीत बिराजदार, पुरुषोत्तम धुत, अनिल छाजेड, राहुल बागले, आकाश कोकरे, ओम लड्डा, विठ्ठलदास मुंदडा, गोपाल शास्त्री , विष्णू राठी, राजेश जाजू, निलेश भंडारे, गुड्डू शर्मा, विजय बलदवा, राकेश मालू व या परिसरातील नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते.