
राजाभाऊ लोंढे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सर्वोत्कृष्ट कर्मचारी पुरस्कार.
टेंभुर्णी (प्रतिनिधी)राजाभाऊ लोंढे यांना जिल्हा मध्यवर्ती बँकेचा सर्वोत्कृष्ट कर्मचारी म्हणून निवड करण्यात आली श्री.लोंढे हे टेंभुर्णी चे रहिवासी असून ते जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या टेंभुर्णी शहर शाखेचे कर्मचारी आहेत.
सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बिझनेस डेव्हलपमेंट प्लॅन 2024 बीडीपी अंतर्गत सन 2023 -24 या वर्षांमध्ये उल्लेखनीय काम केल्याबद्दल जिल्हास्तरीय जिल्ह्यातून वैयक्तिक प्रथम क्रमांक प्राप्त केल्याबद्दल प्रशस्तीपत्र देण्यात आले . राजाभाऊ लोंढे हे मनमिळावू स्वभावाचे कर्मचारी असून जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये कार्य करीत असताना ते वृद्ध, विद्यार्थी यांना बँकेच्या कामासंदर्भात सातत्याने मदतीची भूमिका घेत असतात माढा तालुका पालक अधिकारी मा.संतोष वरपे साहेब यांच्या व महाडिक साहेबांचे उपस्थित प्रशस्तीपत्र प्रदान करण्यात आले या पुरस्कारासाठी त्यांनी
जिल्हा बँकेचे प्रशासक कुंदन भोळे साहेब यांच्या यांचे प्रेरणेने कार्य करीत असल्याचे राजाभाऊ लोंढे यांनी सांगितले सदरचा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन केले जात आहे त्यांचे मित्र ऍड. संतोष कानडे प्रकाश पवार, गणेश भोज, रोहिदास वाघमारे यांनी श्री लोंढे यांचे अभिनंदन व सत्कार केला