विधानसभा निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी अर्ज करावेत
काँग्रेसचे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांचे आवाहन
सोलापूर : सोलापूर शहर व जिल्ह्यातील अकरा विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज सोलापूर शहर व जिल्हा काँग्रेस कमिटी कडे सादर करावेत, असे आवाहन सोलापूर काँग्रेसचे शहर अध्यक्ष चेतन नरोटे व जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.
राज्यातील विधानसभेच्या सार्वत्रिक निवडणुका सप्टेंबर – ऑक्टोंबर २०२४ मध्ये होत आहेत. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांच्या निर्देशानुसार, माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, खासदार प्रणिती शिंदे यांच्या मार्गदर्शाखाली विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाच्या इच्छुक उमेदवारांकडून उमेदवारी अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यानुसार सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व अकरा विधानसभा मतदारसंघातील इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. इच्छुक उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दि. ५ ऑगस्ट २०२४ पर्यंत काँग्रेस भवन सोलापूर येथे जमा करावेत. अधिक माहितीसाठी काँग्रेसचे मीडिया प्रमुख तिरुपती परकीपंडला (मोबाईल नंबर ८८८८०४८८०८) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन शहर अध्यक्ष चेतन नरोटे आणि सोलापूर जिल्हा काँग्रेसचे कार्याध्यक्ष अँड. नंदकुमार पवार यांनी केले आहे.
या पत्रकार परिषदेस प्रदेश चिटणीस किसन मेकाले , शहर कार्याध्यक्ष हणमंतू सायबोळु, दत्तु बंदपट्टे, तिरुपती परकीपंडला, अशोक कलशेट्टी आदी उपस्थित होते.
——