श्रीस्वामी समर्थ बिडी सहकारी संस्था विरुद्ध कामगार सेनेचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन

श्रीस्वामी समर्थ बिडी सहकारी संस्था विरुद्ध कामगार सेनेचे जिल्हा उपनिबंधकांना निवेदन** 

——————————————-

 *सहकारी संस्थेच्या नावाने विडी कामगारांची लूट* 

——————————————-

 *सोलापूर दि.०४/०४/२०२४* 

‌.         सोलापूर शहरातील श्री स्वामी समर्थ बिडी उत्पादक सहकारी संस्था ३१/०३/२०२४ रोजी, संचालक मंडळांनी कुठलीही पूर्वसूचना न देता अचानक बंद केली त्यामुळे ४०० ते ५०० कामगार देशोधडीला लागले आहे., म्हणून ताबडतोब कारखाना चालू करा व महिला बिडी कामगारांचे संपूर्ण द्येय रक्कम मिळवून द्या आणि कायदेशीर कारखाना बंद करणाऱ्या वर कारवाई करा, अशा मागणीचे लेखी निवेदन महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने प्रदेशाध्यक्ष विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली मा.उपनिबंधक सहकारी संस्था सोलापूर यांच्याकडे देण्यात आले आहे.

       मा. जिल्हा उपनिबंधकांना  देण्यात आलेल्या निवेदनात, सोलापूर शहरातील श्रीस्वामी समर्थ बिडी औद्योगिक उत्पादक सहकारी संस्था लि. नोंदणी क्रमांक एसयुआर / एनएसआर/पीआरडी(आय ) ८१८ नोंदणी दि.१९९८ असा आहे. सदर विडी कारखाना दिनांक ३१ मार्च २०२४ पासून महिला कामगारांना कुठलीही लेखी पूर्व सूचना न देता मनमानी पद्धतीने बेकायदेशीर रित्या बंद केले आहे. त्यामुळे सदर कारखान्यात काम करणाऱ्या सुमारे ४०० ते ५०० कामगार बेकार झाले आहेत., आणि त्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. यास संपूर्ण जबाबदार या संस्थेचे चेअरमन, सेक्रेटरी व संचालक मंडळ आणि मूळ मालक सुनील क्षत्रिय हे आहेत.

     महाराष्ट्र कामगार सेनेच्या वतीने सदर संस्थेचे बेकायदेशीर कामकाजाविरुद्ध दि.०६/१०/२०२३ व ०६/११/२०२३ अशा दोन्ही वेळेला निवेदन देऊन संस्थेची चौकशी करावी अशी मागणी करण्यात आली., परंतु याबाबत आपल्या कार्यालयाकडून कुठलीही कार्यवाही झालेली नाही.  जर कारवाई झाली असती तर कारखाना अचानक बंद करण्याचा निर्णय संस्था घेतली नसती., एकूणच कारखाना अचानक बंद केल्याने शेकडो कामगारांना होत असलेला त्रास कमी करण्यासाठी आपल्या माध्यमातून कारखाना चालू करण्याचे आदेश द्यावे, अशी नम्र विनंती असे नमूद करण्यात आलेले आहे.

   मा. जिल्हा उपनिबंधक यांना विष्णू कारमपुरी (महाराज) यांच्या नेतृत्वाखाली निवेदन देणाऱ्या शिष्टमंडळात रेखा आडकी, विठ्ठल कुऱ्हाडकर, अमित भोसले, रमेश चिलबेरी, पाटील, आदींचा सहभाग होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *