
सोलापूर – वीरशैव लिंगायत प्रतिष्ठान तर्फे सोलापूर मार्केट यार्ड येथील चर्मकार श्री ज्ञानेश्वर होनसुरे ह्या चर्मकारास सावलीत बसून काम करण्यासाठी मोठी छत्री मोफत देण्यात आली.
सदर प्रसंगी प्रतिष्टानचे अध्यक्ष मा सर्वश्री राजशेखर विजापुरे , केदारनाथ उंबरजे , ND जवळे मामा, रेवनसिध्द आवजे, आप्पासाहेब मनगुळी, केदार बिराजदार, दिनेश उपासे, सुनिल रामशेट्टी, आनन्द साठे, श्रीकांत बिराजदार, अशोक नागनसुरे व नेताजी पांढरे आदी मान्यवर उपस्थित होते.