सहकार महर्षी गणपतराव साठे नगर पडसाळी – येथील श्री संत कुर्मदास सहकारी साखर कारखाना या कार्यस्थळावर कारखान्याचे चिफ अकौंटंट श्री.रावसाहेब दुधाणे यांच्या हस्ते राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताहाचा प्रारंभ सहकार महर्षी स्व.गणपतराव साठे, श्री संत कुर्मदास महाराज तसेच लोकनेते स्व. विलासरावजी देशमुख साहेब यांचे प्रतिमेचे पूजनाने करण्यात आला.
दरवर्षी प्रमाणे 04 मार्च ते 11 मार्च या कालावधीत आपल्या कारखान्यामध्ये राष्ट्रीय औद्योगिक सुरक्षा सप्ताह साजरा करण्यात येत असून ,औद्योगिक क्षेत्रात सुरक्षेतेला फार महत्व आहे.तसेच सुरक्षेतेचे नियम केवळ या सप्ताहा पुरतेच मर्यादेत न ठेवता कायमस्वरुपी सुरक्षा नियमांचे पालन करावे असेही आवाहन केले.तसेच काम करीत असताना अपघात होऊन, स्वत:वर व आपणांवर अवंलबून असणा-या कुटुंबावर विपरीत परिणाम होवू शकतो, याचे भान सर्वांनी ठेवले पाहिजे. अपघात विरहीत काम करुन स्वत: बरोबरच आपले कुटुंब सुरक्षित राहील याची दक्षता कायम घ्यावी. असे यावेळी उपस्थित अधिकारी कर्मचारी यांना कारखान्याचे सेक्रेटरी यांनी प्रस्ताविका मध्ये सांगितले. यावेळी सुरक्षा अधिकारी यांनी सर्व कामगारांना सुरक्षिततेची शपथ दिली.
यावेळी कारखान्याचे कार्यकारी संचालक श्री.बाळासाहेब पवार, सेक्रेटरी श्री.चंद्रहास गायकवाड, चिफ अकौंटंट श्री.रावसाहेब दुधाणे,चिफ इंजिनिअर श्री.शकील शेख, चिफ केमिस्ट श्री.सुबराव पडसाळकर, शेती अधिकारी श्री.दिपक कुलकर्णी, सुरक्षा अधिकारी श्री.नागनाथ लोकरे, टाईम किपर श्री. सिध्देश्वर बिनगे, परचेस ऑफिसर श्री.अविनाश बागल,स्टोअर किपर श्री.रामचंद्र हाजगुडे, सिव्हील सुपरवायझर श्री.अरुण मोरे, केनयार्ड सुपरवायझर श्री.नेताजी शिंदे, तसेच कारखाना अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थितीत होते.