श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनच्या कार्याचा नावलौकिक : डॉ. शैलेश पाटील      

 नारीशक्ती सन्मान सोहळा उत्साहात

सोलापूर : अल्पावधीत श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनने नावलौकिक मिळविला ,असे प्रतिपादन डॉ. शैलेश पाटील यांनी केले.

       श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनच्या वतीने घेण्यात आलेल्या फोटो ,रील्स

स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ आणि जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून श्री सिद्धेश्वर नारीशक्ती सन्मान सोहळा हॉटेल सूर्या इंटरनॅशनल येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते.                  यावेळी व्यासपीठावर माजी सहायक पोलीस आयुक्त दीपक आर्वी, सूर्या हॉटेलच्या संचालिका प्रभावती सुरवसे,शिवशिम्पि  महिलामंडळ अध्यक्ष  स्मिता नाईक, राष्ट्रीय बुद्धीबळ पंच  रोहिणी तुम्मा ,कसबा गणपती उत्सव  समिती अध्यक्ष शशीकांत बीराजदार,उदयोगपति   समीर लोंढे, श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशनचे अध्यक्ष आनंद  मुस्तारे आदी मान्यवर उपस्थित होतें

       श्री सिद्धेश्वर सोशल फाउंडेशन च्या वतीने सालाबाद प्रमाणे  श्री सिद्धेश्वर महायात्रा काळातील धार्मिक विधी लहान मुलांचे बाराबंदी पोशाख स्पर्धा आणि महिलांचे पारंपारिक वेशभूषा स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. 

           सूत्रसंचालन साक्षी हाऊदे यांनी  तर आभार प्रिया बसवती यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सचिव विकास कस्तुरे ,खजिनदार  सचिन शिवशक्ती, प्रिया बसवंती, विजय नवले,  , गुरुशांत मोकाशी आदींनी परिश्रम घेतले.

या मान्यवरांचा झाला सन्मान

        यावेळी नगर अभियंता सारिका अकुलवार, वैद्यकीय क्षेत्रातील डॉ.संतोषी मुदकण्णा, डॉ. नेहा रोडा, प्रशासकीय क्षेत्रातील प्राचार्य डॉ.  मनीषा शिंदे, सामाजिक क्षेत्रातील अक्कनबळग महिला मंडळाच्या अध्यक्षा  रंजीता चाकोते, शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट काम करणाऱ्या मुख्याध्यापिका पंचशील विद्यालय महामाया रणधीरे, सिद्धेश्वर वुमन्स पॉलिटिक्सच्या उपप्राचार्य नीता आळंगी, पत्रकारिता क्षेत्रातील प्रमिला चोरगी, फॅशन डिझाइनिंग क्षेत्रातील धनश्री मणुरे, सामाजिक क्षेत्रातील वीरशैव कक्कया महिला मंडळ अध्यक्ष संगीता जोगधनकर, आणि सामाजिक कार्यकर्त्या स्मिता चंदनशिवे आणि विशेष उल्लेखनीय पुरस्काराने पुष्पा  खुणे यांना सन्मानित करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *