इंग्रजी विषयाच्या नियामकांच्या बहिष्काराचे निवेदन देताना…

मुंबई विभागीय सचिवांना इंग्रजी विषयाच्या नियामकांच्या बहिष्काराचे निवेदन देताना प्रा.आंधळकर, प्रा. पूर्णपात्रे,प्रा. मणीवन्नन, प्रा.बागवे, प्रा. राजपूत व इतर शिक्षक.

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महासंघाने उत्तर पत्रिका तपासणी वर टाकलेल्या बहिष्काराच्या आजच्या दुसऱ्या दिवशी सुध्दा मुख्य नियामकांची बैठक होऊ शकली नाही.काल इंग्रजी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक झाली नव्हती तर आज हिंदी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठक सुध्दा शिक्षकांच्या बहिष्कारामुळे होऊ शकली नाही.राज्यांमध्ये सहा ठिकाणी इंग्रजी विषयाच्या नियामकांच्या आयोजित केलेल्या बैठकीसुध्दा बहिष्कारामुळे होऊ शकल्या नाहीत.उद्या मराठी विषयाच्या मुख्य नियामकांची बैठकसुध्दा बहिष्कार आंदोलनामुळे होणार नसल्याचे महासंघाचे समन्वयक प्रा. मुकुंद आंधळकर यांनी आज स्पष्ट केले आहे. उद्यापर्यंत राज्य शासनातर्फे कोणत्याही अनुकूल हालचाली झाल्या नाही तर एखादे वाढीव आंदोलन हाती घेण्याची शक्यता असल्याचे महासंघाचे उपाध्यक्ष प्रा. सुनील पूर्णपात्रे यांनी सांगितले. राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या प्रमुखांची तातडीची ऑनलाईन मीटिंग उद्या आयोजित करण्यात आली असल्याचे महासंघाचे सरचिटणीस प्रा संतोष फाजगे यांनी सांगितले.
विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन शिक्षण मंत्री श्री दीपक केसरकर यांनी गप्प न बसता तातडीने शिक्षकांच्या मागण्या मान्य कराव्यात असे आवाहन महासंघाचे अध्यक्ष डॉ संजय शिंदे यांनी केले आहे.
जोपर्यंत सर्व मागण्या मान्य होणार नाही. तोपर्यंत आंदोलन मागे घेतले जाणार नाही. असे महासंघाचे उपाध्यक्ष प्राध्यापक सुनील पूर्णपात्रे जाहीर केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *