सर्वांच्या सहकार्यामुळे महापालिका शाळांचा पट वाढविण्यात यश : जावीर
पदोन्नती निमित्त महापालिका शिक्षण मंडळात सत्कार
सोलापूर : महापालिका शिक्षण मंडळात जवळपास 19 महिने प्रभारी प्रशासनाधिकारी कार्यरत असताना सर्वांच्या सहकार्यामुळे महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांचा पट वाढविण्यात यश आले, असे प्रतिपादन नूतन शिक्षण निरीक्षक ( बृहन्मुंबई ) संजय जावीर यांनी येथे केले.
महापालिका शिक्षण मंडळात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रभारी प्रशासन अधिकारी संजय जावीर यांची शिक्षण निरीक्षकपदी पदोन्नतीने बदली झाल्याबद्दल आणि पत्रकारिता भूषण पुरस्कार मिळाल्याबद्दल किरण बनसोडे यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी शिक्षण मंडळाचे मुख्य लिपिक माहेजबीन शेख आणि
पर्यवेक्षक मनीष बांगर यांच्या हस्ते दोन्ही मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. यावेळी शिक्षण मंडळाचे पर्यवेक्षक भगवान मुंडे, सुरेश कासार, निलोपर सय्यद आदींची प्रमुख उपस्थिती होती.
शिक्षण निरीक्षक संजय जावीर पुढे म्हणाले, स्वातंत्र्य लढ्यातील क्रांतिकारी, ऐतिहासिक हेरिटेज इमारत असलेल्या कार्यालयातून कामकाज करण्याचे भाग्य मिळाले. अनेक चांगल्या गोष्टी करता आल्या. शाळेचा पट वाढविला. बहुतेक सुविधा महापालिकेच्या निधीतून करण्यास प्रयत्न केला. त्याचबरोबर महापालिकेच्या विविध उपक्रम राबवण्यामध्ये यशस्वी झालो. यामध्ये शिक्षण मंडळातील पर्यवेक्षक, लिपिक, शिक्षक , सर्व संघटना पत्रकार यांचे सहकार्य लाभले.
याप्रसंगी लिपिक महेश वालावलकर, सारंग अंजीखाने, रियाज आतार, सचिन जाधवर, जाकीर सय्यद, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नागेश गोसावी, सरचिटणीस अमोल भोसले, रतन साळवे, आशिकेष लोखंडे, भालचंद्र साखरे, नर्सिंग चिप्पा ,नासिर खान, सचिन साखरे, सायली ढोले आदी उपस्थित होते.