
सोलापूर : डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्थेचे (बार्टी) महासंचालक, सुनील वारे यांच्या मार्गदर्शनाखाली संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याबरोबर यावर्षीही काढण्यात आलेल्या संविधान दिंडीचे उद्घाटन करण्यात आले.
या संविधान दिंडीचे उद्घाटन रिपाइंचे प्रदेश उपाध्यक्ष एन. के. साळवे, समीर सोरटे, पलंगे , प्रमोद शिंदे , नातेपुते महावितरणचे शाखा कनिष्ठ अभियंता दीपक कंकाळ ,प्रकल्प अधिकारी प्रणिता कांबळे, समतादूत किरण वाघमारे, ज्योती ओहळ उपस्थित होते.
सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग महाराष्ट्र शासन आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित संविधान दिंडीच्या माध्यमातून वारकरी बांधवांना भारतीय संविधानाची माहिती व्हावी, आपले अधिकार, कर्तव्याची जाणीव व्हावी तसेच संतांच्या समतावादी विचारांचा प्रसार व्हावा हा या संविधान दिडीचा हेतू आहे. भारतीय संविधानाबद्दल तीन प्रत्र विचारून विजेत्यांना भारतीय संविधानाची प्रत, संविधान प्रास्ताविका भेट देऊन सन्मानित करण्यात येत आहे. वारकरी बांधवांना भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकाचे वाटप करून त्यांना भारतीय संविधानाबद्दल आपल्या मूलभूत अधिकार व कर्तव्याची माहिती देण्यात येणार आहे.
जगदुरु श्री संत तुकाराम महाराजांचा पालखी सोहळा दुपारी पंढरपूरकडे प्रस्थान होण्याच्या मार्गावर ठिकठिकाणी बार्टीचा संविधान रथ ही संविधानाचा प्रचार – प्रसार करण्यास सज्ज झाले आहे.