वीरशैव व्हिजनची सलग चौथ्या वर्षी सेवा
सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वर यांचे गुरु श्री मल्लिकार्जुन यांच्या दर्शनासाठी सोलापुर ते श्रीशैलम पायी जाणाऱ्या भक्तांना वीरशैव व्हिजनतर्फे औषधे व प्रथमोपचार पेटी देण्यात आली.
गेल्या 49 वर्षांपासून अखंडीतपणे राजशेखर स्वामी (आहेरवाडीकर) यांच्या नेतृत्वाखाली ही पदयात्रा काढण्यात येते. जवळपास 1500 सदभक्त एक महिनाभर या पदयात्रेत सहभागी होतात.
या पदयात्रेतील भक्तांना उन्हाळ्यामुळे किरकोळ आजार उद्भवतात. तसेच पायी चालून जखमा होतात. त्यांना पदयात्रेच्या मार्गामध्ये वैद्यकीय सेवा सुविधा उपलब्ध होवू शकत नाही. अशावेळी त्यांना अडचणी येऊ नयेत म्हणून वीरशैव व्हिजनच्या वतीने 10 हजार रुपयांची औषधे व प्रथमोचार पेटी देण्यात आली. मागील 4 वर्षापासून ही सेवा बजावण्यात येत आहे.
यंदाची पदयात्रा काल सोमवारी सकाळी निघाली. पदयात्रेचा पहिला मुक्काम कुंभारी येथील श्री गेनसिद्ध मंदिर येथे होता. मंदिरात यात्रेचे उत्तराधिकारी श्रीशैल स्वामी (आहेरवाडीकर) यांच्याकडे वीरशैव व्हिजनचे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार व गंगाधर झुरळे यांच्या हस्ते औषधे व प्रथमोपचार पेटी सुपूर्द करण्यात आली.
यावेळी नागेश घटोळे, महेश स्वामी, संतोष अंकद, रामचंद्र राजमाने, बसवराज माळी, अप्पासाहेब लिगाडे उपस्थित होते.
फोटो ओळी :वीरशैव व्हिजनतर्फे श्रीशैल पदयात्रेकरूंना औषधे व प्रथमोपचार पेटी यात्रेचे उत्तराधिकारी श्रीशैल स्वामी (आहेरवाडीकर) यांच्याकडे देताना वीरशैव व्हिजनचे सहकोषाध्यक्ष विजयकुमार बिराजदार, गंगाधर झुरळे, नागेश घटोळे, महेश स्वामी, संतोष अंकद, रामचंद्र राजमाने,