सोलापूर शहरवासीयांनी पाणी जपून वापरावे : आयुक्त

 महापालिका आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केली उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनी कामाची पाहणी

सोलापूर : सोलापूर शहराची जीवनदायीनी मानल्या जाणाऱ्या उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या कामाची व तिबार पंपिंगची पाहणी आज महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी अधिकाऱ्यांसमवेत केली. चांगल्या पद्धतीने काम होत असल्याबद्दल अधिकाऱ्यांचे कौतुक केले.                                           यावेळी  अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, सार्वजनिक आरोग्य अभियंता व्यंकटेश चौबे, स्मार्ट सिटीचे अभियंता उमर बागवान,  पोचमपाड कंपनीचे व्यवस्थापक अरुण पाटील

 कार्यकारी अभियंता पी व्ही पाटील,

उप अभियंता विजय नलावडे ,

 शाखा अभियंता हरीश एम एस,

 सिद्धेश्वर उस्तुरगे, यलगुलवार ,  एकबोटे , अंबीगार , बाबानगरे , अवताडे, कनिष्ठ अभियंता आदी  उपस्थित होते.

       यावेळी महापालिका आयुक्त तेली – उगले यांनी दुहेरी जलवाहिनीअंतर्गत जॅकवेल, कॉपर डॅम,  उपलब्ध पाईप्स आणि झालेल्या कामाची पाहणी केली. त्या ठिकाणी सुरु असलेल्या जॅकवेल मधील अप्रोच कॅनॉलची पातळी ही 480 मीटरची असून धरण कितीही मायनस मध्ये गेले तरी जॅकवेल मध्ये पाणीपुरवठा होण्यास काही अडचण येणार नाही. 

        उजनी – सोलापूर दुहेरी जलवाहिनीचे काम 110 किलोमीटर लांबी आणि 170 एमएलडी क्षमतेची जलवाहिनी टाकण्याचे हे काम आहे. या कामाला आता गती आली आहे. नोव्हेंबर पर्यंत काम पूर्ण होणार आहे. उजनी ते सोरेगाव पर्यंत ही जलवाहिनी टाकण्याची महत्त्वपूर्ण योजना आहे.वर्क ऑर्डर मधील कराराप्रमाणे नोव्हेंबर 2024 पर्यंत 18 महिन्यात हे काम करण्यात येणार असले तरीही त्यापूर्वीच हे काम पूर्ण करण्याचा शर्तीने प्रयत्न राहणार आहे. यामुळे सोलापूरकरांना 170 एमएलडी पाणी रोज उपलब्ध होणार असल्याची माहिती महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी दिली. 

        सध्या उजनी धरण हे मायनस मध्ये असून सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने तिबार पंपिंग द्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. यासाठी महापालिकेचे अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, कार्यकारी अभियंता व्यंकटेश चौबे, उपाभियंता उत्सुर्गे यांच्या प्रयत्नातून सोलापूर शहरात सुरळीत  पाणीपुरवठा करण्यात येत आहे.त्याबद्दल  आयुक्त यांनी त्यांचे कौतुक केले.

        दुहेरी जलवाहिनी व तसेच तिबार पंपिंग कामा संदर्भात आवश्यक त्या सूचना महापालिकेच्या आयुक्त यांनी सर्व अधिकाऱ्यांना दिल्या. त्याचबरोबर सोलापूर शहरातील नागरिकांनी पाणी जपून वापरावे असे आवाहन महापालिकेच्या आयुक्त शीतल तेली-उगले यांनी केले.

आव्हानात्मक काम केल्याबद्दल 

 आयुक्तांनी केले अधिकाऱ्यांचे कौतुक

     इंजिनिअरिंग दृष्ट्या व अभियांत्रिकी दृष्ट्या आव्हानात्मक असे बांधण्यात येणाऱ्या जॅकवेलचा काम होते. या कामासाठी स्मार्ट सिटीचे अधिकारी, एमजीपीचे अधिकारी तसेच मक्तेदार यांचे सर्व अधिकारी – कर्मचारी यांनी मिळून हे आव्हानात्मक काम एका हंगामामध्ये पूर्ण केल्याबद्दल महापालिकेचे आयुक्त शीतल तेली – उगले यांनी त्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *