249 रोजंदारी, बदली कामगारांना सेवेत कायम करावे 

249 रोजंदारी, बदली कामगारांना सेवेत कायम करावे 

माजी गटनेते आनंद  चंदनशिवे यांनी दिले उपमुख्यमंत्री पवार यांना निवेदन

सोलापूर :  महापालिकेतील सन 1995 नंतर सेवेत कार्यरत असलेल्या 249 रोजंदारी व बदली कामगारांना सेवेत कायम करावे या मागणीचे निवेदन माजी गटनेते आनंद  चंदनशिवे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना दिले. 

        सोलापूर महानगरपालिकेमध्ये सुमारे गेल्या 25 ते 30 वर्षापासून विविध संवर्गातील रोजंदारी व बदली  249 सेवक काम करीत आहेत. या सेवकांना सेवेत कायम करण्यात आलेले नाही. याप्रकरणी तातडीने कार्यवाही करावी, असे निवेदनात म्हटले आहे. दरम्यान, 249 बदली व रोजंदारी सेवकांना सेवेत कायम करण्याबाबतचा विषय लवकरच मार्गी लावू , असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.

      यावेळी माजी नगरसेवक गणेश पुजारी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते इरफान शेख,  महिला जिल्हाध्यक्ष वर्षाराणी शिंदे ,  महिला आघाडीच्या  शशिकला कसफटे ,चित्रा कदम, चंद्रकांत सोनवणे, प्रतीक चंदनशिवे, शहाबाज किंग ,अल्ताफ कुरेशी ,अब्दुल शेख, बापू अड्डेवाले ,अब्दुल शेख, मिनाज पटेल,  सलीम नदाफ, विनोद मिसाळ, रॉक शेख, तनवीर मुजावर, समीर कुरेशी, फिरोज नदाफ, रोजंदारी व बदली सेवक प्रतिनिधी धोंडीबा कापुरे, धीरज वाघमोडे, समाधान सकट आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *