डॉ. मंजूषा शहा ठरल्या मिसेस डिजिटल क्वीनच्या मानकरी
सोलापूर : मिसेस इंडिया एम्प्रेस ऑफ द नेशन सीजन 5 ची अंतिम स्पर्धा ( Beauty Contest) 23 जून 2024 रोजी पुणे हायात येथे पार पडली. इलाईट कॅटेगरीमध्ये “मिसेस डिजिटल क्वीन”म्हणून डॉ. मंजुषा मिलिंद शहा यांची निवड झाली आहे. त्याबद्दल त्यांचे त्यांचे सर्व थरातून अभिनंदन व कौतुक केले जात आहे.
यात देशभरातील विविध प्रांतातील 54 स्पर्धकांनी स्पर्धकांनी भाग घेतला होता. अंतिम फेरीसाठी आठ स्पर्धक निवडले गेले होते. डॉ. मंजुषा शहा प्रसिद्ध भूलतज्ञ व सोलापुरातील प्रथित यश हॉस्पिटल “नवल मॅटरनिटी इनफर्टिलिटी अँड एंडोस्कोपी सेंटरच्या”संचालिका यांनी या स्पर्धेत भाग घेतला होता. त्यांची अंतिम फेरीसाठी निवड झाली. चार दिवस झालेल्या स्पर्धेची विभागणी तीन विभागात केली होती. यासाठी त्यांनी शारीरिक, बौद्धिक आणि कलात्मक गुण वाढविण्यासाठी सहा महिने मेहनत घेतली. आपल्या या यशामागे त्याचे कुटुंबीय आणि सर्व मित्र परिवारांचे आशीर्वाद आणि सहकार्य असल्याचे त्यांनी सांगितले आहे.