
शांतता रॅलीतील बांधवांची
केली जेवणाची व्यवस्था
स्वयंम शिक्षा फाउंडेशनचा उपक्रम
सोलापूर : मराठा आरक्षणासाठी संघर्ष योद्धा मनोज जरांगे- पाटील यांच्या शांतता रॅलीतील सहभागी मराठा बांधवांसाठी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष फाउंडेशनचे संस्थापक सोमनाथ वैद्य यांनी पिठलं – भाकरीच्या जेवणाची व्यवस्था केली.
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे – पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या आंदोलन अंतर्गत शांतता रॅलीच्या दुसऱ्या
टप्प्याची सुरुवात बुधवार ७ ऑगस्ट रोजी सोलापुरातून झाली. या शांतता रॅलीसाठी
आलेल्या बांधवांसाठी स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष व दक्षिण सोलापूर विधानसभेचे इच्छुक उमेदवार सोमनाथ वैद्य यांनी पिठलं – भाकरीचे वाटप स्वयंसेवकाच्या माध्यमातून केले. मोठ्या संख्येने समाज बांधवांनी या जेवणाचा आस्वाद घेतला.
महात्मा बसवेश्वर महाराजांनी सांगितलेल्या विचारातून समता, बंधूता जोपासण्याचे काम सोमनाथ वैद्य करीत आहेत. “जनसेवा हीच ईश्वर सेवा” ब्रिद जोपासत वैद्य यांनी कार्य केले आहे, अशी भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.
सर्व समाज घटकांच्या मदतीला धावून जाणे हे आपले परम कर्तव्य आहे. सामाजिक बांधिलकीतून मी हे कार्य करीत असल्याचे स्वयंम शिक्षा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष सोमनाथ वैद्य यांनी सांगितले.