पूर्व विभाग मानाचा ताता गणपतीची उपायुक्त लोकरे यांच्या हस्ते पूजा
सोलापूर : शहरातील पूर्व विभाग मानाचा ताता गणपतीची पूजा आज सकाळी 9.30 वा महानगरपालिका उपायुक्त आशिष लोकरे यांचे हस्ते पार पाडली.
यावेळी मंडळाचे सल्लागार उमेश मामड्याल , महापालिका सामान्य प्रशासन विभागाचे अधीक्षक लक्ष्मीनारायण दोंतूल यांच्यासह इतर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपायुक्त लोकरे यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी प्रमुख पदाधिकाऱ्यांच्या हस्ते उपायुक्त लोकरे यांचा सत्कार करण्यात आला. शहरातील पूर्व विभाग मानाचा ताता गणपती मंडळाच्या वतीने उत्सव काळात विविध उपक्रम राबविले जातात. याप्रसंगी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
——-