रविवारी होणार पुरस्कार वितरण सोहळा
सोलापूर : अभियंता दिनानिमित्त
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स (आयईआय) यांच्यावतीने दि.15 सप्टेंबर रोजी
दुपारी 4 वाजता शिवस्मारक सभागृह येथे
सर मोक्षगुण्डम विश्वेश्वरय्या इमिनंट इंजिनियर पुरस्कार प्रदान सोहळा आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती सोलापूर शाखेचे अध्यक्ष डॉ. मोहन देशपांडे यांनी पत्रकार परिषदेत दिली.
इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनियर्स ही संस्था गेल्या शंभर वर्षांपासून कार्यरत आहे. या संस्थेतर्फे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. त्यामध्ये टेक्निकल सेमिनार, वर्कशॉप, , परीक्षेसाठी मार्गदर्शन, इंडस्ट्रीचे प्रॉब्लेम सोडविण्यासाठी मार्गदर्शन, विविध कंपन्यांशी केलेला सामंजस्य करार, औद्योगिक भेटी, नवीन संशोधनासाठी मदत असे अनेक कार्यक्रम सोलापूर शाखेच्यावतीने राबवण्यात येतात.
यंदा संस्थेच्यावतीने सोलापुरातील प्रतिथयश इंजिनियर्स यांचा सर मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या इमिनंट इंजिनियर्स पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे. यामध्ये सोलापुरातील प्रसिद्ध सिव्हिल इंजिनियर व उद्योजक किशोर चंडक, डिझाईन इंजिनियर व सिव्हिल इंजीनियरिंग या क्षेत्रातील अरविंद पांढरे, गव्हर्मेंट ऑफ इंडियाचे सदाशिव सुरवसे, पी.पी. पटेल पावडर मेटलर्जी प्रा. लिमिटेडचे चीफ एक्झिक्युटिव्ह केयूर पटेल, एम.एस.ई.बीचे माजी टेक्निकल संचालक आनंद कुलकर्णी, अग्रीकल्चर संशोधन केंद्राचे इंजिनीयर रामचंद्र सांगलीकर तसेच राधेश्याम इंडस्ट्रीचे संचालक विनय पटेल यांना या पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. कर्नाटकातील प्रसिद्ध विश्वेश्वरय्या पगडी, उपरणे व बुके तसेच विश्वेश्वरय्या यांचे शिल्प असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक अरविंद दोशी हे उपस्थित राहणार आहेत. तसेच सोलापूर शाखेचे संस्थापक अध्यक्ष एच. एन. सोमाणी, संस्थापक सचिव डॉ. जी. के . देशमुख, माजी अध्यक्ष सी.बी. नाडगौडा, माजी अध्यक्ष डॉ. एस. एस. पाटील, एस.एम. शेख आदी मान्यवरांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
या पत्रकार परिषदेस एस. एम. शेख, डॉ. उमेश मुगळे, डॉ. संजय बुगडे आदी उपस्थित होते.
