
प्रख्यात तेलुगू प्रवचनकार पद्मश्री डॉ. गरिकीपाटी नरसिंहारावांचे सोलापुरात २१ व २२ सप्टेंबरला प्रवचन
अमृतवाणीतून धर्म, संस्कृती आणि जीवनशैलीवर करणार प्रबोधन
सोलापूर : सुप्रसिद्ध तेलुगू प्रवचनकार ब्रह्मश्री सहस्रावधानी पद्मश्री डॉ. गरिकीपाटी नरसिंहाराव यांची अमृतवाणी दि.२१ व २२ सप्टेंबरला सोलापुरात ऐकायला मिळणार आहे. ते धर्म, संस्कृती आणि जीवनशैलीवर प्रबोधन करणार आहेत, अशी माहिती फेडरेशन ऑफ तेलुगू असोसिएशन्स ऑफ महाराष्ट्र (एफटॅम) अंतर्गत गठीत सोलापूर आयोजन समितीचे अध्यक्ष पेंटप्पा गड्डम यांनी पत्रकार परिषदेत दिली.
हा कार्यक्रम शनिवार दि.२१ व रविवार दि. २२ सप्टेंबर रोजी अक्कलकोट रोड एमआयडीसीतील पद्मावती कन्व्हेंशन्समध्ये होणार आहे. दररोज सायंकाळी 5:30 ते 8:30 ही प्रवचनाची वेळ राहणार आहे. या कार्यक्रमात
डॉ. गरिकीपाटी नरसिंहाराव हे अध्यात्मिक विषयावर प्रवचन देण्याबरोबरच आधुनिक जीवनशैलीमुळे कुटुंब व्यवस्थेवर झालेले परिणाम व या संदर्भातील आवश्यक सुधारणा याविषयी भाष्य करत प्रबोधन करणार आहेत.
सोलापुरात सुमारे दोनशे वर्षांपूर्वी आंध्रातून उदरनिर्वाहासाठी स्थायिक झालेल्या तेलगूजनांसाठी हे प्रवचन म्हणजे एक पर्वणी ठरणार आहे. श्रद्धा,अंधश्रद्धा, क्रियाशीलता, नवनिर्मिती, कौटुंबिक जबाबदारी, महिला सक्षमीकरण अशा अनेक मुद्द्यांवर डॉ. गरिकीपाटी नरसिंहाराव हे भाष्य करून प्रबोधनाचा प्रयत्न करणार आहेत. या प्रवचनाचा सोलापुरातील तेलुगूजनांनी श्रवणानंद घ्यावा,असे आवाहन समितीतर्फे करण्यात आले आहे.
सोलापुरातील त्यांच्या प्रवचनासाठी ‘एफटॅम’ सेंट्रल टीमचे जगनबाबू गंजी (मुंबई) यांच्या मार्गदर्शनाखाली प्रवचनासाठी गठीत समितीचे पदाधिकारी असे – अध्यक्ष पेंटप्पा गड्डम , उपाध्यक्ष मुरलीधर अरकाल, कोषाध्यक्ष गणेश बुधारम, सहकोषाध्यक्ष श्रीधर म्याकल, सचिव भूपती कमटम , सहसचिव विजयकुमार उडता तर कमिटी सदस्य म्हणून
रेणुका बुधारम, गंगाधर देवसानी, सत्यनारायण अडगटला, अंबादास बिंगी, नागनाथ बुरा, मल्लिकार्जुन कमटम, सत्यनारायण गुर्रम, डॉ. अंबादास गाजूल, प्रवीण कोटा, दयानंद मामड्याल, पुरुषोत्तम उडता, गणेश गुज्जा, डॉ. राजेंद्र गाजुल, श्रीनिवास सामलेटी, योगेश म्याकल, अशोक दुस्सा, प्रभाकर भिमनाथ, प्रवीण जिल्ला, अशोक बिटला, नारायण येरवा, अंबादास नक्का यांचा समावेश आहे.
या पत्रकार परिषदेस उपाध्यक्ष मुरलीधर अरकाल, सहकोषाध्यक्ष श्रीधर म्याकल, सचिव भूपती कमटम, सहसचिव विजयकुमार उडता, अंबादास बिंगी, प्रभाकर भिमनाथ, नारायण येरवा आदी उपस्थित होते.
