सोलापूर महापालिका आणि ज्येष्ठ नागरिक समन्वय समितीच्या विद्यमाने ज्येष्ठ नागरिक दिन साजरा
सोलापूर : जागतिक ज्येष्ठ नागरिक दिनाच्या औचित्याने सोलापूर महानगरपालिका आणि सोलापूर ज्येष्ठ नागरिक संघाच्या संयुक्त विद्यमाने गुणवंतांचा सत्कार सोहळा संपन्न झाला.
यावेळी आ. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते आणि सोलापूर महानगरपालिकेच्या सहाय्यक आयुक्त ज्योती भगत पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. उद्योगपती रंगनाथ बंग (आदर्श शिक्षक), आप्पासाहेब कनाळे (जीवनगौरव ),
पं. आनंद बदामीकर , केतनभाई शहा ( सोलापूररत्न) , कविवर्य देवेंद्र औटी (कवीरत्न), अरुण बारस्कर ( लोकरत्न) या मान्यवरांना पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. तसेच सफाई कर्मचाऱ्यांचाही यथोचित गौरव करण्यात आला. चंद्रकला कांबळे , मल्लेश नराल , स्नेहल चपळगांवकर यांचा सत्कार करण्यात आला.
सोलापुरातील विविध ज्येष्ठ नागरिक मंडळांच्या माध्यमातून भरीव कामगिरी पार पाडणाऱ्या विविध संघटनांच्या अध्यक्षांचा ‘समाज रत्न पुरस्कार’ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी जगन्नाथ पाटील, नागनाथ अधटराव, अरुण वाघमोडे, विजय सहस्रबुद्धे, प्रा. विलास मोरे, अशोक ठोंबरे पाटील, मन्मथ कोनापुरे, सिद्राम संके, अरुण कदम, चेन्नय्या स्वामी, विजयकुमार काटवे, विजयकुमार भोसले, बाबुराव नरोणे, नागेश कुंभार, शंकर बटगेरी, एम. बी. काळे, सिद्रामप्पा हुंडेकर, नागनाथ कदम, श्रीमती जयश्री जागीरदार, डॉ. सरिता कोठाडिया यांचा सन्मान करण्यात आला.
स्वागत संघाचे अध्यक्ष घनश्याम दायमा यांनी केले. समन्वय समितीचे अध्यक्ष गुरुलिंग कन्नूरकर यांनी प्रास्ताविक केले.कवी देवेंद्र औटी यांनी कवितेतुन सध्याच्या सामाजिक परिस्थितीचे अचुक वर्णन करुन रसिकांना मंत्रमुग्ध केले. सुत्रसंचलन वाडकर यांनी केले. आभार संजय जोगीपेठकर यांनी मानले.