अक्कलकोट तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरी उमरगे येथे विषय शिक्षिका या पदावर कार्यरत असणाऱ्या आदर्श व नवोपक्रमशील विद्यार्थी प्रिय शिक्षिका रिंकू अनंतराव जाधवर (धस )यांचा मुलगा चिरंजीव आर्यन नवनाथ धस याच्या वाढदिवसाचे औचित्य साधून वाढदिवसानिमित्त तब्बल १२ वर्षापासून दप्तरासह विविध शैक्षणिक व शालेय उपयोगी साहित्य विद्यार्थ्यांना वाटप करतात.जसे शालेय दप्तर,वह्या, पेन,पेपर,पॅड,पाटी,उजळणी, पुस्तक, पेन्सिल आदींचे किट वाटप करून विद्यार्थ्यांना मिष्ठान्न भोजन करून स्वतःच्या मुलाचा वाढदिवस शाळेतील विद्यार्थ्यांसोबत साजरा करून आनंद वाटण्याची सामाजिक ऐक्याचा संदेश देणारी परंपरा गेल्या१२वर्षापासून राबवतात. त्यांचा हा अभिनव उपक्रम चालू आहे .याच प्रमाणे याही वर्षी जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळा बोरी उमरगे येथे शाळेतील इयत्ता पहिली ते सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना ‘दप्तर लाखमोलाचे जीवन घडवी विद्यार्थ्यांचे’ हा संदेश देत उत्तम दर्जाच्या शालेय दप्तर वह्या पेन पेन्सिल रबर पट्टी व मिष्ठान्न भोजन वाटप त्यांनी केले .ज्या ज्या ठिकाणी त्या कार्यरत असतात त्या प्रत्येक ठिकाणी त्या हा अभिनव उपक्रम राबवतात.यासह अनेक नाविन्यपूर्ण उपक्रम त्या राबवत असतात .जसे वृक्ष लागवड ‘ माझी लेक माझा स्वाभिमान , बालविवाह प्रतिबंध , मुलींचे शिक्षण व सक्षमीकरण १० मुलींचे शैक्षणिक पालकत्व यासह विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम त्या राबवितात.
प्रारंभी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राष्ट्रीय विज्ञान दिनाचे औचित्य साधत सी.वी.रमन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करून कार्यक्रमाची सुरुवात झाली .
उपस्थित मान्यवरांचा शॉल पुष्पगुच्छ व लेखणी देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका रिंकू जाधवर (धस) यांनी केले याप्रसंगी त्या म्हणाल्या गेल्या बारा वर्षापासून मी हा उपक्रम घेत असून शैक्षणिक,सामाजिक तळमळीतून या उपक्रमाची सुरुवात केल्याचे त्यांनी म्हटले सामाजिक आर्थिक विषमता दूर करून ही मदतीची साखळी अशीच पुढे माझे विद्यार्थी ही चालवतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली हाच या उपक्रमाचा हेतू असल्याचे त्यांनी म्हटले प्रास्ताविकातून त्यांनी दप्तरांचे महत्व व गरज पटवून दिली .
कार्यक्रमाचे अध्यक्ष अक्कलकोट ग्रामीण पोलीस स्टेशनचे पी .आय .स्वामी साहेब आपल्या अध्यक्षीय भाषणात म्हणाले दान वृत्तीने चांगल्या भावनेने समाज उपयोगी उपक्रम राबवणे आज काळाची गरज आहे .जाधवर धस कुटुंबीय कौतुकास्पद उपक्रम राबवत आहेत .
प्रमुख पाहुणे अविनाश मडिखांबे अध्यक्ष आरपीआय यांनी असे उपक्रम समाजातील गरजवंतासाठी व सामाजिक ऐक्यासाठी आवश्यक असल्याचे आपल्या मनोगतात व्यक्त करत चांगले काम करण्यांच्या पाठीशी आपण नेहमी उभे राहिले पाहिजे ते असे म्हणाले .आदर्श शिक्षिका सोनुबाई कटकधोंड मॅडम म्हणाल्या जाधवर मॅडम यांचे उपक्रम नेहमीच अभिनव व विद्यार्थी समाज उपयोगी असतात स्वयंप्रेरणेने व स्वखर्चाने उपक्रम घेतात त्यांचे कार्य कौतुकास्पद आहे .कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन शाळेचे मुख्याध्यापक सोमेश्वर सर यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पीआय स्वामी ग्रामीण पोलीस स्टेशन तसेच पोलीस कर्मचारी भोसले , मियावाले.प्रमुख पाहुणे अविनाश मडीखांबेअध्यक्ष आरपीआय,आदर्श शिक्षिका सोनूबाई कटकधोंड पत्रकार सिद्धार्थ भडकुंभे ,सुरज निंबाळकर,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष लक्ष्मण कोळी, उपाध्यक्षा रेणुका बिराजदार . सरपंच,निर्मला बिराजदार . श्रीशैल पाटील,देवानंद अस्वले,चंद्रकांत वागदरी,अंबण्णा अस्वले,चंद्रकांत अस्वले, कृष्णा पाटील,संतोष बिराजदार, लक्ष्मीकांत कोळी,राजकुमार वाघमारे,अंबिकाताई कोळी, देवकी उमरगे,श्रीदेवी अस्वले,सुधा वाघमारे,जयंती बिराजदार,लक्ष्मीबाई वागदरी,उषाताई पुजारी,निर्मला बिराजदार,गोदाताई पुजारी समवेत शाळेतील शिक्षक खरटमल,माचल,माळी तसेच गावातील बहुसंख्य लोक उपस्थित होते.कार्यक्रमाचे नियोजन आयोजन नवनाथ धस यांनी केले होते .
तसेच आर्यनला उपस्थितांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी उपस्थितांकडून व पालकांकडून जाधवर – धस कुटुंबाच्या या अभिनव उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे .