पंढरपूर- गोपाळपूर (ता. पंढरपूर) येथील श्री. विठ्ठल एज्युकेशन अँड रिसर्च इन्स्टिट्यूट, पंढरपूर संचलित कॉलेज ऑफ इंजिनिअरींगच्या सिव्हील इंजिनिअरिंग या विभागात दि. २८ फेब्रुवारी व दि.२९ फेब्रुवारी, २०२४ या दोन दिवशी ‘स्ट्रक्चर रिपेअर व मेटेंनन्स’ या विषयावरील कार्यशाळा संपन्न झाली. या दोन दिवसीय कार्यशाळेला उत्तम प्रतिसाद मिळाला. या कार्यशाळेत स्वेरीसह अन्य महाविद्यालयातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला होता.
स्वेरीचे संस्थापक सचिव व कॉलेज ऑफ इंजिनिअरिंगचे प्राचार्य डॉ.बी.पी.रोंगे यांच्या मार्गदर्शनाखाली व शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार यांच्या नेतृत्वाखाली ही कार्यशाळा संपन्न झाली. यामध्ये न्यू सातारा, एस.व्ही.आय.टी,एस.व्ही, एस. एम.डी. अक्कलकोट महाविदयालय, स्वेरीज कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग(पॉलि.) यांच्यासह इतर महाविद्यालयतील जवळपास १५० हून अधिक विद्यार्थी व प्राध्यापकांनी सहभाग घेतला. या प्रसंगी स्वेरी संचलित इंजिनिअरींग (पॉलिटेक्निक)चे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ यांनी सर्व उपस्थितांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रा. अविनाश कोकरे, प्रा. मंगेश सुरवसे, प्रा. पृथ्वीराज गुंड, प्रा. प्रशांत भागानगरे, प्रा. चैताली अभंगराव, प्रा. प्रवीण केळकर, प्रा. गिरीश फलमारी यांनी डिजीटल रीबाऊंड हॅमर, अल्ट्रासोनिक पल्स व्हेलॉसिटी, हाफसेल पोटेन्शिअल मीटर टेस्ट, कव्हर मीटर (रीबार लोकेटर) काँक्रीट कोअर कटर या मशीन्सची तांत्रिक प्रात्यक्षिकाद्वारे माहिती दिली. यावेळी प्रा. सी.आर.लिमकर यांनी ‘स्टक्चरल ऑडीट व नॉन डिस्ट्रक्टीव्ह टेस्टींग’ यावर सखोल मार्गदर्शन केले. पुढे त्यांनी स्ट्रक्चरल ऑडिट नॉन डीस्ट्रक्टिव पद्धतीने करण्याबद्दलही माहिती दिली. स्ट्रक्चरल ऑडिट साठी वापरल्या जाणाऱ्या उपकरणांची माहिती देऊन ती कोठे व कशी वापरावी याबद्दलही माहिती दिली. यावेळी शैक्षणिक अधिष्ठाता व सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागप्रमुख डॉ.प्रशांत पवार म्हणाले की, ‘उत्तम विद्यार्थी बनविण्यासाठी योग्य निर्णय व चिकाटी असेल तर यश लवकर मिळते’ असे सांगून शैक्षणिक प्रवासात आलेले अनुभव सांगितले. तसेच प्रा. करण पाटील यांनी ‘भविष्यात उत्तम महाविद्यालय कसे निवडावे’ याबद्धल बहुमोल मार्गदर्शन केले. समन्वयक म्हणून प्रा. अमृता लुगडे यांनी काम पाहिले. यावेळी न्यु सातारा महाविद्यालयाच्या प्रा.सोनाली जगदाळे, अक्कलकोट महाविदयालयातील विभागप्रमुख प्रा.डी.ए. जनगोंडा व प्रा.पी.जी. अल्लोळी, स्वेरी पॉलिटेक्निकचे प्रा.आर. जे. साळुंखे व इतर सहकारी उपस्थित होते. सुत्रसंचालन प्रा.पी.जी.सिद्धम यांनी केले तर आभार प्रा. चैताली अभंगराव यांनी मानले.
छायाचित्र- स्वेरीच्या सिव्हील इंजिनिअरिंगचे विभागात ‘स्ट्रक्चरच्या रिपेअर व मेटेंनन्स’ या विषयावरील कार्यशाळेचे उदघाटन करताना डावीकडून प्रा. अविनाश कोकरे, प्रा.डी.ए. जनगोंडा, पॉलिटेक्निक इंजिनिअरींगचे प्राचार्य डॉ. एन.डी. मिसाळ, प्रा. सी.आर.लिमकर, शैक्षणिक अधिष्ठाता डॉ.प्रशांत पवार, विद्यार्थिनी, प्रा.सोनाली जगदाळे, प्रा. नितीन शिंदे, प्रा. अक्षय साळुंखे व विद्यार्थी.