सोलापूर (प्रतिनिधी) गेल्या आठवड्यात भुवनेश्वर येथे खळबळ माजवल्यानंतर ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने भारताच्या पहिल्या फॅशन फेस्टिव्हलचा मोहरा 9 मार्च रोजी पुण्याकडे वळवला. हा सोहळा आपल्यासोबत घेऊन आला विविध लक्झरी फॅशन ब्रॅंड्सचे अत्यंत स्टायलिश अनुभव, भारतातील काही उत्कृष्ट लाइफस्टाइल ब्रॅंड्सने बनवलेले वेधक पॉप-अप्स आणि लोकप्रिय कलाकारांनी दिलेले लयदार संगीत परफॉर्मन्सेस.या फेस्टिव्हलमध्ये उपस्थित राहिलेल्या लोकांना फॅशन आणि स्टाइलने ओतप्रोत असा एक आकर्षक नाव अनुभव मिळाला. या प्रसंगी एक आकर्षक फॅशन शो योजण्यात आला होता.या सादरीकरणात भारतातील 9 आघाडीचे डिझाईनर – अल्पना नीरज,ब्लोनी अंतर अग्नी,मंदिरा विर्क,गीशा डिझाईन्स,वेरान्डा, श्वेता कपूर,तानिया खनुजा आणि नितीन बाल चौहान सहभागी होते.वरुण बहलने सुंदर अभिनेत्री अदिती राव हैदरीसह एक असे कलेक्शन सादर केले,ज्यामध्ये परंपरा आणि इनोव्हेशन यांचा सुभग संगम होता,काळाने मान्य केलेले तंत्र होते आणि डिझाईनमध्ये आधुनिक ट्विस्ट होता.या फेस्टिव्हलमध्ये नाशेर माइल्स,अनिशा गांधीची द स्टाइलिंग रूम,जॉन जेकब्स,ऑल यू कॅन स्ट्रीट,डूडल मॅपल्स,मायग्लॅम आणि ऑडी पुणे या लाइफस्टाइल ब्रॅंड्सच्या सहयोगाची एक शृंखला देखील सादर करण्यात आली.व्हीजे आणि अभिनेत्री अनुशा दांडेकरने या समारंभाचे सूत्रसंचालन केले, जिच्यामुळे या फेस्टिव्हलच्या स्टाइलमध्ये भरच पडली.पेरनॉड रिकार्ड इंडियाचे चीफ मार्केटिंग ऑफिसर कार्तिक मोहिन्द्र म्हणाले,आपण भारतातील फॅशनचा चेहरा-मोहरा बदलत असताना ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हल एक आकर्षक नवीन फॉरमॅट घेऊन आले आहे,फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलविषयी बोलताना डिझाईनर वरुण बहल म्हणाला,ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने पुण्यात एक वेधक,अनोख्या प्रकारचा फॅशन फेस्टिव्हल अनुभव दिला.अदिती राव हैदरी म्हणाली,भारतातील पहिलेवहिले फॅशन फेस्टिव्हल सुरू करून ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने पुण्यात स्टाइल आणि ग्लॅमरच्या भविष्याचे दर्शन घडवले.ब्लेंडर्स प्राइड ग्लासवेअर फॅशन नेक्स्टचे क्यूरेटर-इन-चीफ आशीष सोनी म्हणाले,ब्लेंडर्स प्राइड फॅशन नेक्स्ट फेस्टिव्हलने भारतातील फॅशन अनुभवात एक आकर्षक बदल घडवून आणला आहे.