
आर्यनंदी नागरी सहकारी पतसंस्था व आर्यनंदी एज्युकेशन अँड रिसर्च फाउंडेशन च्या संयुक्त विद्यमाने, रविवार दि. 10/ 03/ 2024 रोजी सायंकाळी सहा वाजता शिवस्मारक सभागृह, नवी पेठ, सोलापूर येथे, महिला दिन व सावित्रीबाई फुले स्मृती दिन निमित्त
विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य केलेल्या कर्तृत्ववान महिलांना आर्यनंदी आदर्श पुरस्कार 2024 देऊन गौरविण्यात आले.
याप्रसंगी आर्यनंदी निधी कंपनीच्या संचालिका व सल्लागार सदस्य डॉ. सौ. शिल्पा फडकुले मॅडम, संचलिका श्रीमती मंजिरी सावळे, सल्लागार सदस्या सौ. शोभना सागर, सौ. शांता येळमकर, सौ. शशीरेखा गहेरवार, प्रमुख पाहुणे म्हणून मा. डॉ. असावरी कुलकर्णी, मा. डॉ. सरिता कोठारी यांच्या हस्ते प्रतिमा पूजन व दिप-प्रज्वलन करण्यात आले.
पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती
श्रीमती दिपाली सागर अंबूरे (महिला वाहन प्रशिक्षक)
सौ श्रद्धा निलेश एखंडे (उद्योजिका)
डॉ सारिका होमकर (वैद्यकीय तज्ञ)
ॲड शितल डोके सूर्यवंशी (विधीज्ञ)
सौ. ऐश्वर्या निंबाळकर (अभियांत्रिकी तज्ञ)
श्रीमती पल्लवी सुरवसे (समुपदेशक)
सौ संगीता जोगदनकर (समाजसेविका)
सौ. नीलम उपाध्ये (इव्हेंट मॅनेजर)
ॲड सौ साधना संगवे (विधिज्ञ), सोलापूर.
प्रास्ताविक : संस्थेच्या सल्लागार सदस्य डॉ. शिल्पा फडकुले मॅडम प्रास्ताविक वर बोलताना म्हणाल्या की, मागील 24 वर्षापासून ही पतसंस्था कार्यरत असून, स्थापनेपासून आँडीट वर्ग अ मध्ये आहे. पतसंस्था फक्त आर्थिक क्षेत्रातच कार्यरत न राहता, सामाजिक, सहकार, साहित्य, आरोग्य, शैक्षणिक, कला व क्रीडा अशा सर्व क्षेत्रात परिवर्तनशील व उल्लेखनीय कार्य करत असल्याचे सांगितले . पतसंस्थेचे हे रौप्य महोत्सवी वर्ष असून या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त वर्षभर विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज आपण महिला दिन कार्यक्रम करीत आहोत. समाजातील महिलांच्या योगदानाला अन् कर्तुत्वाला मान्यता देण्यासाठी, समाजात त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी, हा दिवस साजरा केला जातो. सावित्रीबाई फुले यांच्यामुळे आज प्रत्येक क्षेत्रामध्ये महिला पुरुषांच्या खांद्याला खांद्या लावून उभ्या आहेत. पण तरीसुद्धा आज महिलांना म्हणाव तितका मान सन्मान मिळत नाही. आज महिला सुरक्षित आहेत, असं दिसत नाही. आजच्या युगात महिला घरापासून ऑफिसपर्यंत सर्व काही सांभाळत असताना आणि कोणत्याही क्षेत्रात पुरुषांच्या तुलनेने मागे आढळत नाहीत. उलट त्या घर सांभाळून ऑफिसचे काम करताना दिसतात. आपल्या आयुष्यात त्यांच्या त्यागाचा व योगदानाचा मोठा वाटा आहे. आजच्या या दिवशी आपण सर्वांनी मिळून, महिलांचा स्वाभिमान व आत्म सन्मानाचे रक्षण करण्याची शपथ घेतली पाहिजे.
अतिथी मनोगत : इ. एस. आय. हॉस्पिटलच्या अधिक्षिका मा. डॉ. आसावरी कुलकर्णी हे आपलं मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, डॉ. राजेश फडकुले व डॉ सौ. शिल्पा फडकुले यांच्यामुळे या पतसंस्थेचा माझा जवळचा संबंध असून, ही पतसंस्था आर्थिक क्षेत्रा बरोबरच सामाजिक क्षेत्रामध्ये ही अग्रेसर असल्याचे मला माहीतच होते. या पतसंस्थेचे हे सामाजिक कार्य असेच वाढत राहो. एक अतिशय चांगला उपक्रम या पतसंस्थेमार्फत होत आहे याचा मला अभिमान आहे. या पतसंस्थेच्या पुढील कार्यास शुभेच्छा.
अध्यक्षीय भाषण : कार्यक्रमाचे अध्यक्ष मा. डॉ. सरिता कोठारी या आपले अध्यक्षिय मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, महिलांचा गौरव करणे ही खरोखरच अतिशय चांगली बाब आहे. राष्ट्र निर्मितीमध्ये महिलांचे योगदान भरपूर आहे. त्यांना संधी मिळाली की प्रत्येक संधीचे ते सोन्यात रूपांतर करतील, याची मला खात्री आहे. या संस्थेचे कार्य खूपच उल्लेखनीय आहे. हे कार्य असेच घडत राहो, ही सदिच्छा.
यावेळी सर्व पुरस्कार प्राप्त महिलांनी आपले मनोगत व्यक्त केले व पुरस्काराबद्दल पतसंस्थेचे आभार व्यक्त केले.
याप्रसंगी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. राजेश फडकूले सर, उपाध्यक्ष श्री महावीर गुंडाळे, श्री बाहुबली दुरुगकर, डॉ. सुरेश व्यवहारे, श्री प्रभाकर व्हटकर, श्री निलेश एखंडे, सल्लागार सदस्य श्री अशोक भालेराव, श्री अरविंद शहा, श्री अनंतकुमार रणदिवे, श्री किशोर रणदिवे, संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री वैभव आहेरकर, संस्थेच्या व्यवस्थापिका सौ. लक्ष्मी आरगी, कर्मचारी प्रतिनीधी श्री प्रविण बुर्से, श्री विलास कटके व इतर मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी संस्थेचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्र संचालन संस्थेच्या महिला सदस्यां कु. दिपाली दुरूगकर व सौ. मयूरी दुरूगकर यांनी तर आभार प्रदर्शन संस्थेच्या सल्लागार सदस्या सौ. शोभना सागर यांनी केले.
कार्यक्रमानंतर उपस्थित सर्वांनी अल्पोपहार व चहापानाचा आस्वाद घेतला.