
महापालिका महिला व बालकल्याण समितीचा उपक्रम
सोलापूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने सोलापूर महानगरपालिकेचे महिला अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी सोलापूर महापालिकेमध्ये आयोजित होम मिनिस्टर कार्यक्रमात दर्शना काटेवाल या पैठणीच्या मानकरी ठरल्या आहेत.
या होम मिनिस्टर कार्यक्रमांमध्ये एकूण 120 महिला सहभागी झाल्या होत्या. या सर्व महिलांमध्ये विविध स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेमधून तीन विजेते काढण्यात आले असून त्यामध्ये प्रथम क्रमांक दर्शना काटेवाल, द्वितीय क्रमांक रेणुका वागालोलू, तृतीय क्रमांक मेहरून तांबोळी यांनी पटकाविला. या तिन्ही विजेत्यांना महापालिकेच्या वतीने पैठणी देण्यात आली. महपालिकेचे अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे यांच्या हस्ते आणि सहाय्यक आयुक्त ज्योती भगत- पाटील, सहाय्यक आयुक्त शशिकांत भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत विजेत्यांना पैठणी देण्यात आल्या. याप्रसंगी वीर माता रुक्मिणी सिद्राम कांबळे तसेच वीर पत्नी नीता शशिकांत कांबळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी विधी अधिकारी संध्या भाकरे, स्नेहल चपळगावकर, महिला व बालकल्याण अधिकारी विठ्ठल कस्तुरे, वर्षाराणी कस्तुरे,मोहन कांबळे, मल्लेश नराल, बळवंत जोशी,प्रथमेश सदाफुले, सविता शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. होम मिनिस्टर या कार्यक्रमाचे संचलन बळवंत जोशी यांनी केले.