
विविध समाजाच्या सांस्कृतिक भवनासाठी
४८ तासात उपमुख्यमंत्री पवारांनी मंजूर केला ७ कोटीचा निधी
राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांची माहिती
सोलापूर : सोलापूर शहरात विविध समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व इतर विकास कामांसाठी एकूण ७ कोटीचा निधी अवघ्या ४८ तासात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंजूर केला आहे. त्याचा शासन निर्णय ही काढण्यात आला असून तसे आदेश महापालिका आणि जिल्हा प्रशासनाला दिले असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष माजी नगरसेवक किसन जाधव यांनी पत्रकार परिषदेत दिली.
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे ३ मार्च रोजी सोलापूर दौऱ्यावर आले होते. त्यावेळी त्यांनी सोलापूर शहरातील विविध ठिकाणी भेटी दिल्या. विविध समाज घटकांशी चर्चा करून समस्या, प्रश्न आणि करावयाची विकास कामे यासंदर्भात चर्चा केली होती. याच दौऱ्यात त्यांनी आपल्या भाषणात सोलापूर शहराचा मिनी भारत म्हणून उल्लेख केला होता. सोलापूर शहर हे बहुभाषिक शहर आहे. यामुळे येथील विविध समाजासाठी संस्कृत संस्कृतिक भावनांची गरज होती. त्यासाठी आम्ही उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे मुंबईत मंत्रालयात जाऊन मागणी केली होती. त्यांनतर तत्काळ त्यावर अंमलबजावणी करत उपमुख्यमंत्री पवार यांनी विविध १५ विकास कामांना मंजुरी देत सात कोटीचा निधी मंजूर केला. अवघ्या ४८ तासात त्याची अंमलबजावणी झाली. तसा शासन निर्णय आणि आदेश संबंधित विभागाला देण्यात आले आहेत. फुले – शाहू – आंबेडकरांच्या विचारांचा वारसा जपत शहरातील विविध समाज घटकांसाठी हे भवन बांधण्यात येणार असल्याचेही प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले.
महापालिका क्षेत्रात विविध १५ कामासाठी एकूण सात कोटीचा निधी उपमुख्यमंत्री पवार यांनी मंजूर केला आहे. यामध्ये शहरात छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, रेवणसिध्देश्वर मंदिर (विजापूर नाका) रंगरंगोटी करणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रूपये, साहित्यरत्न लोकशाहिर अण्णाभाऊ साठे समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० रूपये, क्षत्रिय समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, राजमाता आहिल्यादेवी होळकर समाज मंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवन बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, गवळी समाज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, श्री आदि जांबमुनी महाराज मोची समाज समाजमंदिर बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रूपये ,
श्री बसवेश्वर महाराज सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, पद्मशाली समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, मुस्लीम समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये, ख्रिश्चन समाजासाठी सांस्कृतिक भवन बांधणे व विविध विकास कामे करणे – ५० लाख रुपये,
प्रभाग क्र. २२ लिमये वाडी येथे अंतर्गत ड्रेनेज लाईन घालणे – २५ लाख रूपये, प्रभाग क्र. २२ बुवा गल्ली येथे पिण्याच्या पाण्याची पाईप लाईन घालणे – २५ लाख रूपये , प्रभाग क्र. २२. २ नंबर झोपडपटटी येथे अंतर्गत रस्ते कॉक्रिटीकरण करणे – ५० लाख रुपये असे एकुण ७ कोटी रुपये निधी मंजूर करण्यात आला आहे, असे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव यांनी सांगितले.
या पत्रकार परिषदेस चेतन गायकवाड उपस्थित होते.
पक्षाला योग्य वाटले तर विधानसभा
निहाय कार्याध्यक्ष नियुक्ती होईल
सोलापूर शहरे बहुभाषिक शहर आहे. सर्व जाती धर्मातील समाज घटकांना घेऊन काम करावे लागणार आहे. सर्व समाज घटकांना न्याय दिला पाहिजे. सोलापूर शहरात एकापेक्षा अधिक कार्याध्यक्ष पद देण्याची जर पक्षश्रेष्ठीकडे मागणी केली असेल आणि पक्षाला योग्य वाटले तर सोलापूर शहरांतर्गत तीन विधानसभा निहाय पक्षाचे कार्याध्यक्ष नियुक्त केले जाऊ शकतात. मागणी संदर्भात सोलापूर शहराध्यक्ष संतोष पवार हे अधिक माहिती देऊ शकतात. सोलापूर जिल्हा कार्यकारणीत चार कार्याध्यक्ष आहेत तर पिंपरी – चिंचवड येथेही चार कार्याध्यक्ष नियुक्त करण्यात आले आहेत. यामुळे पक्षाला योग्य वाटले तर तसा निर्णय होऊ शकतो, असे प्रदेश उपाध्यक्ष जाधव यांनी स्पष्ट केले.