महापालिका आयुक्तांनी काढले नवे विभाग वाटप आदेश !
नवे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित यांनी घेतला पदभार !
सोलापूर : महानगरपालिकेच्या विविध विभागाचे कामकाज प्रशासकीय कामकाजाच्या सोयीसाठी महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमचे कलम ६९ अन्वये नियुक्त प्राधिकारी यांच्याकडे नवे विभाग सोपविण्यात आले आहेत. तसे आदेश महापालिका आयुक्त शीतल तेली – उगले यांनी आज काढले आहेत.
दरम्यान, महापालिकेतील विविध विभागाच्या कामकाजाचे पुनर्विलोकन करून यापूर्वी सोपविण्यात आलेल्या विभागात बदल करण्यात आला आहे. महानगरपालिका आयुक्तांच्या सर्वसाधारण नियत्रंणाखाली अधिकाऱ्यांकडे नवे विभाग सोपविण्यात आले आहेत. अधिकारी व त्यांना सोपविण्याचा आलेले विभाग असे –
अतिरिक्त आयुक्त संदिप कांरजे :
१) सार्वजनिक बांधकाम विभाग, शहर सुधारणा विभाग, प्रकल्प अधिकारी, २) पाणी पुरवठा विभाग व ड्रेनेज विभाग, ३) प्राणी संग्रहालय व पशु वैद्यकिय विभाग, ४) विभागीय कार्यालय क्र. ५,६, ७ व ८, ५. मंडई (कोंडवाडा) व लायसन विभाग, ६) आपत्ती व्यवस्थापन व अग्निशमन विभाग, ७) विद्युत विभाग, ८) नगर सचिव विभाग, ९) संगणक विभाग, १०) विधी विभाग, ११) जनगणना कार्यालय आदी.
उपायुक्त -१- मच्छिद्र घोलप :
१) सार्वजनिक आरोग्य विभाग व घनकचरा व्यवस्थापन विभाग, २) सुरक्षा विभाग, ३) अभिलेखापाल कार्यालय, ४) क्रीडा व सांस्कृतिक विभाग, ५) विभागीय कार्यालय क्र. १,२,३ व ४ , ६) परिवहन विभाग, ७)निवडणूक कार्यालय, ८) महिला व बालकल्याण विभाग,
९) कामगार कल्याण व जनसंपर्क कार्यालय व दिव्यांग कल्याण विभाग, १०) यू.सी.डी. कार्यालय – एनयूएलएम सह, ११) पर्यावरण विभाग, उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण विभाग १२) प्रार्थामक शिक्षण मंडळ व प्रशाला, १३)अतिक्रमण विभाग, १४) वाहन विभाग.
उपायुक्त -३- आशिष लोकरे :
१) मालमत्ता कर विभाग (शहर, शहर हद्दवाढ, गवसु), २) सामान्य प्रशासन विभाग, ३) भूमी व मालमत्ता विभाग (जाहिरात परवाना, हुतात्मा स्मृती मंदिरसह), ४) जन्म-मृत्यु विभाग व विवाह नोंदणी कार्यालय ५) वैद्यकीय आरोग्य विभाग -एनयूएचएम सह ६) मलेरिया विभाग -आरोग्याधिकारी मार्फत, ७) भांडार विभाग – सामान्य व आरोग्य.
सहाय्यक आयुक्त – १- शशिकांत भोसले :
१) सामान्य प्रशासन विभाग, २) मंडई (कोंडवाडा) व लायसन विभाग, ३) भूमी व मालमत्ता विभाग – जाहिरात परवाना, हुतात्मा स्मृती मंदिरसह, ४) घनकचरा व्यवस्थापन विभाग, ५) क्रीडा व सांस्कृतिक विभाग, ६) वाहन विभाग,
सहाय्यक आयुक्त – २ – ज्योती भगत :
१) पर्यावरण विभाग उद्यान विभाग व वृक्ष प्राधिकरण विभाग, २) प्राणी संग्रहालय व पशु वैद्यकिय विभाग, ३) महिला व बालकल्याण विभाग, ४) विधान सल्लागार, ५) कामगार कल्याण व जन संपर्क कार्यालय, ६) संगणक विभाग, ७) यु.सी.डी. कार्यालय (एनयुएलएम सह).
सहाय्यक आयुक्त – ३ – गिरिश पंडीत :
१) निवडणूक कार्यालय, २) प्राथमिक शिक्षण मंडळ व प्रशाला, ३)जन्म-मृत्यु विभाग व विवाह नोंदणी कार्यालय, ४)वैद्यकीय आरोग्य विभाग एनयूएचएम सह, ५) मलेरिया विभाग आरोग्याधिकारी मार्फत, ६) भांडार विभाग सामान्य व आरोग्य, ७) अतिक्रमण विभाग.
अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त व सहाय्यक आयुक्तांची प्रतीक्षा !
महापालिकेत नवे सहाय्यक आयुक्त गिरीश पंडित हे रुजू झाले आहेत. दरम्यान, एक उपायुक्त, एक अतिरिक्त आयुक्त आणि तीन सहाय्यक आयुक्त ही शासनाकडील पदे अद्याप रिक्त आहेत. अतिरिक्त आयुक्त निखिल मोरे
आणि उपायुक्त विद्या पोळ यांच्या बदलीनंतर त्या पदावर शासनाने अधिकारी पाठविला नाही. तसेच महापालिकेतील सार्वजनिक आरोग्य अभियंता हे पद प्रभारीच आहे.